तेल्हारा – आज तेल्हारा येथे अकोल्याचे खासदार संजूभाऊ धोत्रे यांच्या सूचनेनुसार व पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा.आ.रणधीरभाऊ सावरकर,अकोट मतदारसंघाचे आमदार प्रकाशभाऊ भारसाकळे,भाजयुमो प्रदेशाध्यक्ष मा.विक्रांतदादा पाटील युवामोर्चा प्रदेश सचिव व अकोला जिल्हा प्रभारी सोपानजी कनेरकर यांच्या मार्गदर्शनात राज्य सरकार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात निदर्शने करत दोषी शिक्षिकेला न्याय मिळावा व आरोपीवर नवीन शक्ती कायद्यानुसार कारवाई करत पीडितेला न्याय द्यावा अशी मागणी युवा मोर्चा तर्फे करण्यात आली.
औरंगाबाद येथील एका शिक्षिकेवर नोकरी देण्याचे आमिष देऊन अतिप्रसंग करणाऱ्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या प्रदेश अध्यक्षांवर गुन्हा दाखल झाला असूनही कारवाई करण्याच्या नावाने बोंब आहे राज्याचे गृहखाते झोपले आहे का असा खडा सवाल भाजयुमो चे जिल्हाध्यक्ष सचिनबाप्पू देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष अनिलजी पोहणे,शहर अध्यक्ष महेंद्रजी गोयनका,सरचिटणीस गजाननजी गायकवाड,उपाध्यक्ष विजयजी देशमुख,नगर सेवक मंगेशजी सोळंके,भाजयुमो जिल्हा सचिव सुमित गंभीरे, भाजयुमो तेल्हारा शहर अध्यक्ष गणेश इंगोले,राहुल झापर्डे,पंचायत समिती सदस्य दिलीप पवार,गोकुळ हिंगणकार दीपक मोडक,भावेश पवार,ऋषी ठाकूर,शिवा खाडे,भारत जोशी,छोटू विखे,अक्षय कापसे,भाजप चे कार्यकर्ते व पदाधिकारी उपास्थित होते.