नवी दिल्ली : ब्रिटनमधील नव्या कोरोना म्युटेशनचे भारतात सहा बाधित सापडल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अभ्यासानुसार ब्रिटनमधील आढळून आलेले कोरोनाचे हे नवे म्युटेशन आधीच्या विषाणूपेक्षा ७० पटीने जास्त वेगाने पसरतो. पण, डॉक्टरांना हा आरोग्यास अधिक धोकादायक असल्याची शक्याता नाकारली आहे.
भारतात २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबरपर्यंत ब्रिटनमधून जवळपास ३३ हजार प्रवासी आले आहेत. त्यातील ११४ कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या सर्वांमधील कोरोना विषाणूचा जनुकीय अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे असे सरकारने सांगितले. ज्या राज्यात हे रुग्ण आढळले आहेत त्या राज्यातील प्रशासन त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि त्यांची आरटी – पीसीआर टेस्ट करत आहे.
ब्रिटनमधील या नव्या कोरोना विषाणूच्या म्युटेशनचा शोध ज्यावेळी ब्रिटनमध्ये सप्टेंबरच्या दरम्यान, कोरोना रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाल्यानंतर लागला होता. सध्या भारतात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. गेल्या २४ तासांत भारतात १६ हजार ४३२ नवे रुग्ण आढळले आहेत. जून महिन्यानंतर पहिल्यांदाच कोरोना रुग्णांच्या संख्येत इतकी घट झाली आहे.