तेल्हारा – तालुक्यातील १५ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या ३४ ग्रामपंचायतचे निवडणुकी साठी आज सोमवार ला १६३ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता दोन दिवस शिल्लक असताना मोठी गर्दी दिसून आली कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तहसील कार्यालयामध्ये सोशल डिस्टंसिंग फज्जा उडाल्याचे दिसून आले यावरून तहसील प्रशासनाचे नियोजन कोलमडल्याचे सुद्धा दिसून आले.
तेल्हारा तहसील कार्यालयावर आज सोमवारला तेल्हारा तालुक्यातील होऊ घातलेल्या चौतीस ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज भरण्याकरिता मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले यामध्ये अनेक इच्छुक उमेदवार व त्यांचे सहकारी मास्क न वापरता परिसरामध्ये फिरताना दिसून आले तसेच ग्रामपंचायत निवडणुकीकरिता या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली त्यामधील बहुतांश कर्मचारी सुधा मास्क न वापरतात निवडणूक कार्यक्रम पार पडत असल्याचे दिसून आले या सर्व प्रकारामुळे शासनाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन कोणी न केल्याचे दिसून आले तहसील कार्यालयामध्ये सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाल्यामुळे तेल्हारा तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता वर्तविला जात आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता दोन दिवस शिल्लक राहिले असून या दोन दिवसांमध्ये तेल्हारा तहसील कार्यालयावर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे शेवटच्या दोन दिवसात नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी येणाऱ्याची मोठी संख्या लक्षात घेता तहसील प्रशासनाने नियोजनबद्ध कार्यक्रम आखुन सोशल डिस्टनसिंग कसे पाडले जाइल याकरिता योग्य नियोजन करण्याची आवश्यकता आहे. आज तहशील कार्यालयात झालेली मोठी गर्दी पाहता कोरोना गेला की काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देण्याची आवश्यकता आहे.