अकोट (देवानंद खिरकर)– अकोट तालुक्यातील बोर्डी येथील पत्रकार नरेंद्र जगन्नाथजी कोंडे यांची नुकतीच रा.का.ओबीसी सेल च्या अकोट तालुकाध्यक्ष पदी नीवड करण्यात आली.अकोलास्थित राष्ट्रवादी कांग्रेस पार्टिच्या कार्यालयात रा.का.पार्टीची आढावा बैठक आयोजीत केली.
तेथे विविध विषयावर चर्चा करण्यात आली.नरेंद्र कोंडे यांची निवड प्रदेशाध्यक्ष ईश्वर बालबुधे साहेब,जिल्हाध्यक्ष संग्रामभैय्या गांवडे,ओबीसी जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण बोले,माजी आमदार बलिरामजी सिरस्कार,हरीदासजी भदे,युवक जील्हाध्यक्ष शिवाभाऊ मोहोड,प्रदेश प्रवक्ता डाँ.आशाताताई मिरगे यांच्याहस्ते नियुक्ति पत्र देण्यात आले.तसेच.महेश ढोकणे यांची जिल्हा संघटकपदी,सुनील पाटील गेबड यांची तालूका कार्याध्यक्षपदी तर महेंद्र सुरे यांची तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.कार्यक्रम ला रा.का.पार्टीचे मान्यवर ऊपस्थीत होते.