• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

हिवरखेड नगरपंचायतचा प्रस्ताव मंत्रालयात धडकला,ग्रामपंचायत ऐवजी थेट नगरपंचायतची निवडणुक व्हावी… नागरिकांची मागणी

Team by Team
December 28, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
विधान परिषदेत गाजला हिवरखेड नगरपंचायतचा मुद्दा,आ. मिटकरींनी उचलले अकोला जिल्ह्यातील अनेक विषय
12
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

हिवरखेड(धीरज बजाज)- हिवरखेड नगरपंचायतचा प्रस्ताव अखेर नगर विकास मंत्रालयात धडकला असून जनतेचा आणि शासनाचा अमूल्य वेळ, श्रम, मनुष्यबळ, आणि वारेमाप पैसा वाया जाऊ नये यासाठी ग्रामपंचायत ऐवजी थेट नगरपरिषद किंवा नगरपंचायत ची निवडणुक घेण्यात यावी अशी जनभावना मोठ्या प्रमाणात व्यक्त होताना दिसत आहे.

आमदार अमोल मिटकरी यांनी विधिमंडळात आवाज उचलल्यानंतर बहुप्रतिक्षीत असलेल्या अकोला जिल्ह्यातील हिवरखेड ग्रामपंचायत चे नगरपंचायत मध्ये रूपांतर करण्याचा अकोला जिल्हाधिकाऱ्यांचा प्रस्ताव अखेर नगर विकास मंत्रालयात धडकला असून आता शासनाच्या अधिसूचनेकडे जनतेचे लक्ष लागले आहे. 40,000 च्या वर लोकसंख्या आणि 18,000 च्या जवळपास मतदार असलेले हिवरखेड हे शहर ही विदर्भातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखले जाते. मागील 20 वर्षांपासून हिवरखेडच्या नागरिकांचा नगरपंचायत साठी सामुहिक संघर्ष सुरू आहे. राजकीय इच्छाशक्ती अभावी हा विषय आतापर्यंत प्रलंबितच राहिलेला होता. मागील अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यकर्ते धिरज बजाज, हिवरखेड विकास मंच, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, लोकजागर मंच, जागरूक आणि विकासप्रेमी नागरिकांनी निरंतर पाठपुरावा सुरूच ठेवला आहे. सर्व प्रकारच्या त्रुटीपूर्ती करून सुधारित प्रस्ताव जिल्हापरिषदेत पोहोचल्यावर, सीईओ श्री सौरभ कटियार, यांनी तात्काळ त्याच दिवशी हिवरखेड नगरपंचायत चा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. जिल्हाधिकारी श्री जितेंद्र पापळकर यांनीही वेळ न दडवता हा प्रस्ताव नगर विकास मंत्रालयात रवाना केला. सदर प्रस्ताव नगरविकास मंत्रालयाने धडकल्या मुळे लवकरच हिवरखेड नगरपंचायत बाबत अधिसूचना निघू शकते अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जर हिवरखेड ग्रामपंचायतची निवडणूक 15 जानेवारीला पार पडली आणि काही दिवसातच नगरपंचायत चा निर्णय निघाला तर ग्रामपंचायत निवडणूक फक्त औपचारिक मात्र ठरणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जनतेचा आणि शासनाचा अमुल्य वेळ श्रम मनुष्यबळ आणि वारेमाप पैसा खर्च होणार असून नगरपंचायत आदेश निघाल्यास हे सर्व व्यर्थ ठरणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. हिवरखेड च्या मतदार याद्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. अनेक मतदारांची नावे जाणीवपूर्वक मूळ प्रभाग ऐवजी दुसऱ्या प्रभागात समाविष्ट झाल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळेच जाणीवपूर्वक नावे दुसर्‍या प्रभागात गेल्याने मतदानाच्या वेळी शेकडो मतदार स्वतःच्या प्रभागातील उमेदवारांना इच्छा असूनही मतदान करू शकणार नाहीत. त्यामुळे शेकडो मतदारांचा हिरमोड होणार आणि मतदान केंद्रावर नावे शोधण्यात त्यांची धांदल उडणार अशी शक्यताही व्यक्त होत आहे. त्यामुळे मतदार यादी सुधारित करून ग्रामपंचायत एवजी थेट नगरपंचायत नगरपरिषद च्या निवडणुका घेण्यात यावा अशी जनभावना व्यक्त होत आहे.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी सर्वांचीच तत्परता
ह्या सर्वांच्या संघर्षाला साथ मिळाली ती आमदार अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, सीईओ सौरभ कटियार, उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, डिप्टी सीईओ राहुल शेळके, उंबरकार, न पा प्रशासन अधिकारी टवलारे मॅडम, शशिकांत देशपांडे, तहसीलदार राजेश गुरव, नायब तहसीलदार विजय सुरळकर, गिल्ले, गटविकास अधिकारी भरत चव्हाण, प्रशासक आणि पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सरोदे, ग्राम विकास अधिकारी भीमराव गरकल, तत्कालीन सरपंच सौ अरुणाताई ओंकारे आणि सर्व ग्रा. प.सदस्य, सर्व कर्मचारी बांधव, मंडळ अधिकारी झाडोकार, हिवरखेड चे तलाठी देशमुख, राठोड, मावळे, प्रत्येक ग्रामसभांमध्ये उपस्थित असणारे जागरूक आणि सक्रिय गावकरी, सर्व सजग पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, इत्यादी अनेकांच्या सामूहिक सहकार्याने हा प्रस्ताव नगर विकास मंत्रालयापर्यंत पोहोचण्यात यश मिळाले.

प्रतिक्रिया
हिवरखेड नगरपंचायत प्रस्तावित असल्याने नगर विकास मंत्रालय, महाराष्ट्र शासन आणि निवडणूक आयोग यांनी योग्य निर्णय घेऊन नगरपंचायत घोषित करून थेट नगरपंचायतच्या निवडणुका घ्यावा अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो.
धिरज बजाज, सामाजिक कार्यकर्ते, हिवरखेड.

विधिमंडळाच्या पावसाळी व हिवाळी अधिवेशनात हिवरखेड ग्रामपंचायतीचे नगरपरिषद अथवा नगरपंचायत मध्ये रूपांतरित करण्याची मागणी मी केली. राज्य सरकारने सुद्धा लोकसंख्येच्या तुलनेत हिवरखेड नगरपंचायत बाबत सकारात्मकता दाखवली असून, सीईओ व जिल्हाधिकारी साहेबांनी तसा अहवाल मंत्रालयामध्ये वर्ग केला आहे. मी त्याचा पाठपुरावा करत असून लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय होईल.
अमोल मिटकरी, विधान परिषद आमदार.

Tags: हिवरखेड ग्रामपंचायत
Previous Post

इंटेलिजन्स ब्यूरो (Intelligence Bureau) मध्ये २ हजार पदांची भरती…

Next Post

अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघ: छायाचित्र नसलेल्या मतदारांची यादी प्रसिद्ध; दोन दिवसांत छायाचित्रे जमा करण्याचे आवाहन

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
जिल्ह्यातील 225 ग्रामपंचायतीचे निवडणूकीकरीता मतदार यादी कार्यक्रम घोषीत

अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघ: छायाचित्र नसलेल्या मतदारांची यादी प्रसिद्ध; दोन दिवसांत छायाचित्रे जमा करण्याचे आवाहन

onion

कांदा उत्‍पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, १ जानेवारीपासून निर्यातीस परवानगी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.