आपल्याला सरकारी नोकरी करायची आहे? तिही सेंट्रल गव्हमेंटमध्ये? मग ही बातमी आपल्यासाठी आहे. देशाच्या इंटेलिजन्स ब्यूरो (Intelligence Bureau) मध्ये नोकरीची संधी असून यासाठी गृह मंत्रालयाने (Home Ministry, MHA) नोटिफिकेशन जारी केले आहेत. आपल्यासाठी ही मोठी संधी असून अट एकच आहे. तुम्ही या देशातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा कॉलेजमधून कोणत्याही विषयात पदवीधर असायला हवे.
इंटेलिजन्स ब्यूरो (Intelligence Bureau) मध्ये असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर, ग्रेड-२ (ACIO) या पदासाठी ही भरती घेण्यात येणार आहे. तर IB व्दारे यासाठी एसीआयओ परीक्षा (IB ACIO Exam) घेतली जाईल. अर्ज करण्याची प्रक्रिया १९ डिसेंबरपासून सुरू झाली असून अंतिम तारीख ९ जानेवारी २०२१ आहे.
*पदाचे नाव- असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर, ग्रेड- २ (ACIO)*
*एकूण जागा – २०००*
आरक्षण-
जनरल – ९८९
आर्थिक दुर्बल गट – ११३
ओबीसी – ४१७
एससी – ३६०
एसटी – १२१
*शिक्षणाची अट*
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. कॉम्पुटरची माहिती असावी.
*वयाची अट*
उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षे असायला हवे. तर आरक्षित वर्गासाठी वयात ५ वर्षांची सूट देण्यात आलेली आहे.
*अर्ज कोठे करावा?*
इच्छुक उमेदवारांनी गृह मंत्रालयाच्या वेबसाईटवर https://cdn.digialm.com//per/g01/pub/852/EForms/image/ImageDocUpload/806/111884419544685830203.pdf
किंवा
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/1258/68961/Instruction.html
वर ऑनलाईन अर्ज करावा