• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 23, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

स्व.डॅडी देशमुख जयंती समारोह व पुरस्कार वितरण सोहळा; ज्येष्ठ रंगकर्मी अरुण घाटोळ सन्मानित

Team by Team
December 28, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम
Reading Time: 1 min read
82 0
0
बोनस, वेतनवाढ च्या हपत्या करीता वीज कर्मचारी 14 नोव्हेंबर पासून संपावर, तेल्हारा येथे कर्मचारी चे निदर्शने
18
SHARES
589
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – स्व. बाबुराव साहेबराव उपाख्य डॅडी देशमुख जयंती समारोह व पुरस्कार वितरण सोहळा आज येथे पार पडलायावेळी ज्येष्ठ रंगकर्मी अरुण घाटोळ यांना डॅडी देशमुख स्मृती जीवन गौरव पुरस्काराने राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

हॉटेल सेंटर प्लाझा येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास अकोल्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या समवेत विधान परिषद सदस्य आ. अमोल मिटकरी, महापौर अर्चनाताई मसने, माजी आमदार तुकाराम बीडकर, बल्लूभाऊ जवंजाळ, प्रा.डॉ.संतोष हुसे तसेच संयोजन समितीचे प्रा.मधु जाधव, संजय खडपकर, सदाशिव शेळके, अशोक रहाटे, प्रशांत देशमुख तसेच देशमुख परिवारातील सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर अर्चनाताई मसने या होत्या. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, डॅडी देशमुख यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच डॅडी देशमुख यांच्या कार्याचा परिचय करुन देणारा माहितीपटही दाखवण्यात आला.

यावेळी आ.अमोल मिटकरी म्हणाले की, कला क्षेत्रात युवक युवतींनी पुढे यावे. जिल्ह्यातील सांस्कृतिक चळवळीला उत्तेजन मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नव्या जोमाच्या तरुण तरुणींनी अकोल्याचा कला सांस्कृतिक क्षेत्रात नाव लौकिक व्हावा, हे डॅडी देशमुखांचे स्वप्न पूर्ण करावे, असं आवाहन केलं.

सन्मानार्थी अरुण घाटोळे यांनी सत्काराला उत्तर दिले. ते म्हणाले की, रंगभूमी ही माणसाला वास्तविक माणूस म्हणूनच दाखवते. माणसाला माणूस म्हणून दाखवणाऱ्या या वास्तव माध्यमातच मी काम केले. नाटकातून समाजातील विविध प्रश्नांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. या पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ सदस्य रमेश थोरात, माहिती पट निर्माते डॉ. राजेश देशमुख, सौंदर्य स्पर्धा विजेती कु.पूजा विष्णू मुळे यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षीय समारोपात महापौर मसने यांनी शहरातील सांस्कृतिक चळवळीला उत्तेजन देण्यासाठी सहयोग देऊ, असे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुकाराम बीडकर यांनी केले. प्रा. मधु जाधव यांनी ज्येष्ठ रंगकर्मी अरुण घाटोळे यांच्या कार्याचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन किशोर बळी यांनी केले.आभार प्रदर्शन सदाशिव शेळके यांनी केले. या सोहळ्याला शहरातील कलारसिक तसेच नाट्य व चित्रपट क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होत्या.

Tags: स्व.डॅडी देशमुख जयंती समारोह
Previous Post

दुग्ध व्यवसाय एक कंपनी म्हणून चालवावा – शांताराम गायकवाड

Next Post

अधिकारी दौऱ्यावर बाळापूर तहसील वाऱ्यावर..!

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
बोनस, वेतनवाढ च्या हपत्या करीता वीज कर्मचारी 14 नोव्हेंबर पासून संपावर, तेल्हारा येथे कर्मचारी चे निदर्शने

अधिकारी दौऱ्यावर बाळापूर तहसील वाऱ्यावर..!

वंचितच्या युवा जोडो अभियाना अंतर्गत बार्शिटाकळि तालुका आणि शहर नियोजन बैठक सम्पन्न

वंचितच्या युवा जोडो अभियाना अंतर्गत बार्शिटाकळि तालुका आणि शहर नियोजन बैठक सम्पन्न

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.