• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 4, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

दुग्ध व्यवसाय एक कंपनी म्हणून चालवावा – शांताराम गायकवाड

Team by Team
December 28, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम
Reading Time: 1 min read
81 0
0
दुग्ध व्यवसाय एक कंपनी म्हणून चालवावा – शांताराम गायकवाड
13
SHARES
582
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – दुधाचा व्यवसाय करतांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व प्रक्रिया करुन दुधाची विविध उत्पादने बनवून तरुणांनी तो एक कंपनी म्हणून चालवावा, असे प्रतिपादन पशुतज्ज्ञ व उद्योजक गोविंद डेअरी फलटण जि. साताराचे महाव्यवस्थापक डॉ. एस. पी. गायकवाड, यांनी केले. महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, कृषिनगर, अकोला तर्फे दि. २१ ते २५ या कालावधीत ऑनलाइन आधुनिक दुग्धव्यवसाय उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून डॉ. गायकवाड बोलत होते.

महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, कृषिनगर, अकोला यांच्या वतीने या ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत कमी खर्चात शास्त्रोक्त पद्धतीने दुग्धव्यवसाय उद्योजकता विकास कसा करावा? यावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध विषयतज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उदघाटन पशुतज्ज्ञ व उद्योजक गोविंद डेअरी फलटण जि. साताराचे महाव्यवस्थापक डॉ. एस. पी. गायकवाड यांनी केले. अध्यक्षस्थानी संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. अनिल भिकाने हे होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून उद्गीर येथील सहयोगी अधिष्ठाता डॉ. माधव पाटील, व आयडीबीआय बँक, नागपूरचे व्यवस्थापक डॉ. नंदकिशोर अकोटकर हे उपस्थित होते.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

या प्रशिक्षण कार्यक्रमात दुग्ध व्यवसाय उद्योजकता विकासासाठी उद्योजकाच्या मानसिकतेचा विकास, किफायतशीर मुक्त संचार गोठा, मुरघास निर्मिती, प्रजनन व्यस्थापन, रोगनियंत्रण, एकात्मीक पशुपालन, टाकाउपासून टिकाउ व मुल्यवर्धित दुग्ध पदार्थ आदी विषयांवर डॉ. शैलेश मदने (मुंबई), डॉ चंद्रप्रकाश खेडकर (वरूड), डॉ. साईनाथ भोकरे (सातारा), डॉ. अजय खानविलकर (सातारा), डॉ. विजय केळे (गुजरात), डॉ. प्रफुल्ल पाटील (छत्तीसगड), डॉ. आरीफ शेख (संगमनेर), डॉ.संदिप रिंधे (परभणी), डॉ. वैभव लुले (वरूड), प्रा. डॉ. अनिल भिकाणे, डॉ. अभय कुलकर्णी, व मुकुंद गिरी, डॉ. प्रशांतकुमार कपले (अकोला) यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशिक्षण समन्वयक डॉ. प्रशांतकुमार कपले यांनी केले. तर कार्यक्रम समारोप प्रसंगी संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता, डॉ. अनिल भिकाने, प्रा. डॉ प्रशांत वासनिक, अधिष्ठाता, दुग्ध तंत्रज्ञान, मपमविवि, नागपूर, प्रा. डॉ नितिन मार्कडेंय, सहयोगी अधिष्ठाता, परभणी व डॉ संतोष शिंदे हे उपस्थीत होते.

या प्रशिक्षण कार्यक्रमात महाराष्ट्र तसेच कर्नाटक राज्यातील ५१ विविध क्षेत्रातील नवउद्योजक, शेतकरी, पशुपालक, दुग्ध व्यावसायिक, कृषि पदवीधरक, अभियंते, डॉक्टर्स, सुशिक्षित बेरोजगार युवक व बचत गटातील महिला यांनी सहभाग नोंदवून पाच दिवसीय ऑनलाइन प्रशिक्षण घेतले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक डॉ. प्रशांतकुमार कपले तसेच सहसमन्वयक डॉ. दिलीप बदुकले, डॉ. गिरीश पंचभाई, डॉ. मोहिनी खोडके, डॉ. कुलदीप देशपांडे, डॉ. मंगेश वड्डे, डॉ. नरेश कुलकर्णी व गजानन वाघ यांनी परिश्रम घेतले.

Tags: महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ
Previous Post

व्याळा ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम रद्द: सुधारीत प्रभाग रचना करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश

Next Post

स्व.डॅडी देशमुख जयंती समारोह व पुरस्कार वितरण सोहळा; ज्येष्ठ रंगकर्मी अरुण घाटोळ सन्मानित

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
बोनस, वेतनवाढ च्या हपत्या करीता वीज कर्मचारी 14 नोव्हेंबर पासून संपावर, तेल्हारा येथे कर्मचारी चे निदर्शने

स्व.डॅडी देशमुख जयंती समारोह व पुरस्कार वितरण सोहळा; ज्येष्ठ रंगकर्मी अरुण घाटोळ सन्मानित

बोनस, वेतनवाढ च्या हपत्या करीता वीज कर्मचारी 14 नोव्हेंबर पासून संपावर, तेल्हारा येथे कर्मचारी चे निदर्शने

अधिकारी दौऱ्यावर बाळापूर तहसील वाऱ्यावर..!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.