टोल प्लाझावरून येत्या १ जानेवारीपासून जाणाऱ्या प्रत्येक चारचाकी वाहनांना फास्टॅग लावणे बंधनकारक असणार आहे. फास्टॅग न लावणाऱ्या वाहनांचे रजिस्ट्रेशन २५ डिसेंबरपर्यंत रोखण्यात येणार आहे. या संबंधी आरटीओने काल (बुधवार) डीलरना दिशा निर्देश जारी केले आहेत.
सर्व चारचाकी वाहनांना फास्टॅग लावणे अनिवार्य राहणार आहे. सोबतच चेकिंग दल वाहन चालकांना फास्टॅग लावण्यासाठी सूचना करतील. त्यांनी सांगितले की, लखनऊ आरटीओ कार्यालयात सर्व प्रकारच्या चारचाकी वाहनांच्या नोंदणीकृत वाहनांची संख्या ६ लाखाच्या वर आहे. यामध्ये सव्वा लाख वाहने ही रजीस्ट्रेशन झालेली आहे. यामध्ये २५ टक्के वाहनांना ही फास्टॅग लावण्यात आली आहेत.
फास्टॅग नसलेल्या वाहनांना टोल टॅक्स मध्ये मिळणार नाही सूट..
राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझावर बिन फास्टॅग लावता धावणाऱ्या वाहनांना टोल टॅक्समध्ये सूट मिळणार नाही. नव्या नियमांनुसार वाहन चालक जर २४ तासात परतणार असतील आणि फास्टॅग जर वाहनांवर लावलेला असेल, तर टोल टॅक्स मध्ये ५० टक्के सूट मिळेल. म्हणजेच एक प्रकारे टोल माफ होणार आहे.
एनएचएआय चे संचालक एनएन गिरी यांनी म्हटले आहे की, या प्रकारची फास्टॅग योजना ही वाहन धारकांना आकर्षित करण्यासाठी करण्यात आली आहे. या पाठिमागे डिजिटल कॅशलेस प्रणालीला पूर्णपणे लागू करण्याचा विचार आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने १ जानेवारीपासून सर्व वाहनांना फास्टॅग अनिवार्य केले आहे.