मुंबई : मराठा उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे आरक्षणाचा लाभ शैक्षणिक प्रवेश व सेवाभरती यासाठी होण्याकरिता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गात किंवा आर्थिकदृष्ट्या मागास आरक्षणातून लाभ घेणे ऐच्छिक असेल,उमेदवाराने शैक्षणिक प्रवेशातील किंवा शासन सेवेत भरतीकरिता आर्थिकदृष्ट्या मागास गटातून आरक्षणाचा लाभ घेतल्यास सदर उमेदवार मराठा आरक्षणाच्या लाभास पात्र ठरणार नाही,आर्थिकदृष्ट्या मागास घटकाचे प्रमाणपत्र देतांना मराठा समाजातील उमेदवारांना मागील आर्थिक वर्षाच्या उत्पन्न व मत्ता याआधारे राज्य शासनाने विहीत केलेले निकष लावण्यात येतील.हे आदेश सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली विशेष व इतर याचिकांमधील अंतरीम आदेशावरील निर्णयाच्या अथवा अंतिम निर्णयाच्या अधीन राहणार आहेत.