अकोट(देवानंद खिरकर) – अकोट तालुक्यातील ग्राम पंचायत बोर्डी यांनी सन 2010 ते सन 2015 या कालावधीत बोर्डी गावात विविध योजनेंतर्गत केलेल्या रस्ते ,नाली बांधकाम या करिता गैरअर्जदार 1 ते 5 यांचे कडून गौणखनिज घेतले होते.सदर गौणखनिज बाबत बोर्डी मधुन जिल्हाधिकारी,पालकमंत्री अकोला यांचेकडे लेखी तक्रार करण्यात आली होती.या तक्रारीवरुन उपविभागीय अधिकारी अकोट यांनी ग्राम पंचायत बोर्डी यांनी केलेल्या विविध कामाची तपासणी केली असता.सदर कामा करिता वापरण्यात आलेले गौणखनिज बाबत वाहतुक पासेस,रायल्टि,नसल्यामुळे सदरचे वापरण्यात आलेले गौणखनिज हे अवैध असल्याचे स्पस्ट केले.व सबंधीत गैरअर्जदार 1 ते 5 यांना 23 लाख रुपये दंड केला होता.व सदर दंड भरणे बाबत तिनवेळा लेखी नोटीसेस सुध्दा बजावल्या होत्या.तरी गैरअर्जदार यांनी दंडाचा भरणा न केल्यामुळे अखेर सबंधीत तलाठी यांना गैरअर्जदार यांच्या मालमत्ते बाबत शोध घेवून मालमत्तेवर बोजा चढवण्याच्या आदेश लेखी पत्राद्वारे दिला आहे.