पातूर (सुनिल गाडगे) : स्पर्धेच्या युगात ठिकायचे असेल तर नवीन शिक्षणाप्रणाली आत्मसात केली पाहिजे, मात्र हे करतांना उद्याची युवा पिढी संस्कारक्षम व्हायला हवी, यासाठी राष्ट्रसंतांचा विचार मनात रुजविला पाहिजे, हा संस्काराचा ठेवा पातुरच्या किड्स पॅराडाईजने जोपासला आहे, असे प्रतिपादन आचार्य वेरूळकर गुरुजी यांनी केले.
पातूर येथील किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल येथे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव निमित्ताने शाळेचा भूमिपूजन सोहळा सोमवारी थाटात पार पडला. यावेळी सोहळ्याच्या अध्यक्षास्थानी आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरुजी होते. यावेळी ते बोलत होते.दर्जेदार शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना सर्व सुविधायुक्त वर्गखोल्या उपलब्ध करून अत्याधुनिक वास्तू उभी करण्याचा संकल्प पातुरच्या किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल ने केला आहे. या शैक्षणिक दालनाचे भूमिपूजन दिनांक 21 डिसेंबर 2020रोजी सोमवारला पार पडले.
यावेळी या भूमिपूजन सोहळयाला प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज, विधानपरिषदेचे आमदार अमोल दादा मिटकरी, शिक्षक आमदार ऍड. किरणजी सरनाईक, प्रभात किड्सचे संचालक डॉ. गजाननजी नारे, बहुजन पत्रकार संघांचे प्रदेश सरचिटणीस ऍड. सुधाकरराव खुमकर, राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन समितीचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर बरगट, श्री गुरुदेव सेवाश्रमचे अध्यक्ष ह. भ. प. तिमांडे महाराज, जेष्ठ गुरुदेव प्रचारक नामदेवराव गव्हाळे, अ. भा. माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष मनीष हिवराळे, राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन समितीचे सचिव ऍड. संतोषदादा भोरे, रविदादा वानखडे, चौबे महाराज,जेष्ठ पत्रकार ए बी पी माझा चे जिल्हा प्रतिनिधी उमेश भाऊ अलोने, दूरदर्शनचे जिल्हा प्रतिनिधी विशाल भाऊ बोरे, मार्गदर्शक श्रीमती, सरस्वताबाई गाडगे, सरपंच सौ. रीनाताई शिरसाट, टी एन बी कॉलेज चे संचालक गणेशभाऊ भाकरे, ब्लॉसम किड्सचे संचालक प्रा. सुधीर सरदार, पं. स. चे गटनेते अजयभाऊ ढोणे, किड्स पॅराडाईजचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे, कार्यकारी संचालिका सौ. ज्योत्स्ना गाडगे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर ग्रामगिता आणि संविधानचे पूजन करून दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रा. विलास राऊत यांनी संकल्पगीत सादरकेले. त्याना मंगेश राऊत यांनी साथसंगत केली. करून गोपाल गाडगे यांनी आपल्या प्रास्ताविकमधून शाळेची वाटचाल आणि भूमिका विषद केली. यानंतर शिक्षक आमदार ऍड किरणराव सरनाईक यांनी आपल्या भाषणातून किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या भूमिपूजन सोहळ्याला शुभेच्छा दिल्या. शैक्षणिक वाटचालीत किड्स पॅराडाईजने आदर्श निर्माण केला, सोबतच पॅरामेडिकलचे विविध कोर्सेस आणून विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होईल आणि आरोग्य विभागात चांगली यंत्रणा तयार होईल असे मत आमदार सरनाईक यांनी व्यक्त केले. यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या भाषणातून किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या संघर्षमय वाटचालीचा मागोवा घेत वाटचालीचे कौतुक केले. आणि भविष्यात किड्स पॅराडाईज पातूर तालुक्यातील शैक्षणिक हब होईल, असा विश्वास व्यक्त केला. ऍड. सुधाकर खुमकर आणि डॉ. गजानन नारे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे बहारदार संचालन श्रीकृष्ण पखाले यांनी केले तर आभार वंदना पोहरे यांनी मानले. प्रा. विलास राऊत यांनी सुमधुर आवाजात गायिलेल्या राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे, नरेंद्र बोरकर, जयेंद्र बोरकर, तुषार नारे, बजरंग भुजबळ, सुलभा परमाळे, नितु ढोणे, प्रियंका निमोडीया, वैष्णवी बंड, किरण दांडगे, सुषमा इनामदार, सविता गिराम, भाग्यश्री काढोणे, सैय्यद वकार, विकास वानखडे, रुपाली पोहरे, शुभम पोहरे आदींनी परिश्रम घेतले.