अकोट(देवानंद खिरकर) – वारकरी संप्रदाय व गुरुदेव सेवा मंडळ यांच्या धार्मिक कार्यक्रमाला शंभर भाविकांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात यावी. याकरिता अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले होते.व त्या उपोषणाची सांगता आमदार रणधीरजी सावरकर साहेब व आमदार गोपीकिशन जी बाजोरिया साहेब यांच्या हस्ते करण्यात आली होती. वारकर्यांच्या उपोषणला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याकरिता आमदार गोपीकिशनजी बाजोरिया साहेब यांनी गणेश महाराज शेटे व इतर महाराज मंडळींना मुंबई येथे विधान भवन मधे माननीय मुख्यमंत्री साहेबांची प्रत्यक्ष भेट घडून देण्याकरता बोलावले असता वारकरी संप्रदाय व गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने शिष्टमंडळ मुंबई येथे दाखल झाले व मुख्यमंत्री साहेबांच्या भेटीची पासही काढण्यात आली पण उपस्थित महाराज मंडळींची RTPCL टेस्ट केलेली नसल्यामुळे मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून पर्यटन मंत्री श्री आदित्य ठाकरे साहेब यांची भेट करून देण्यात आली असता गणेश महाराज शेटे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला व वारकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
वारकऱ्यांनी नियमाचे पालन करून धार्मिक कार्यक्रम करावे आम्ही वारकरी संप्रदाय व गुरुदेव सेवा मंडळाचा फार आदर करतो. कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल होणार नाही अशी ग्वाही देतो. असे उद्गार श्री आदित्य ठाकरे साहेबांनी काढले त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांचे पी ए नाईक साहेब, मा जी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, पालकमंत्री बच्चुभाऊ कडू, आमदार रोहित दादा पवार, आमदार अमोल दादा मिटकरी, आमदार प्रकाश भाऊ भारसाकडे ,आमदार गोवर्धन शर्मा साहेब , सुरेश महाराज बडे मुंबई , आमदार अनिल पाटील ,नगर सेवक हरेश केनी साहेब यांचा सत्कार करून निवेदन देण्यात आले वारकर्यांची मागणी लावून धरण्या करीता आमदार रणधीर जी सावकर साहेब यांनी शर्तीचे प्रयत्न केले. समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज काही कारणास्तव मुंबई येथे उपस्थित राहू शकले नाहीत परंतु त्यांनी पुढाकार घेऊन सहकार्याची भूमिका दाखवली विधान भवनामध्ये अनेक सन्माननीय आमदार साहेबांच्या भेटी झाल्या सोबत उपस्थित मान्यवर मंडळी विक्रम महाराज शेटे, तुकाराम महाराज भोसले, विलास महाराज कराड, राजेंद्र कोलट्टके साहेब उपस्थित होते