अकोला : – राष्ट्रीय विधी सेवा प्राधीकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधीकरण, मुंबई यांच्या सुचनेनुसार २०२० सालचे दुसरे राष्ट्रीय लोकअदालत चे आयोजन शनिवार दिनांक १२ डिसेंबर २०२० रोजी अकोला जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयामध्ये सकाळी १०ः३० ते संध्याकाळी ५ः३० दरम्यान करण्यात आले होते. न्यायालयात प्रलंबीत असलेले दावे तडजोडीने आणि सामंजस्याने निकाली निघावेत यासाठी आयोजिण्यात करण्यात आलेल्या लोक अदालतीमध्ये प्रलंबित प्रकरणापैकी एकून ८, ११० प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालत मध्ये तडजोडी करीता ठेवण्यात आली होती. एकून ११४६ प्रकरणाचा समेट घडून आला . यामध्ये मुख्यत्वे दिवाणी, फौजदारी स्वरूपाची तसेच मोटार वाहण अपघात प्रकरण व कलम १३८ एन .आय. अॅक्ट अशा प्रकरणात तडजोड होऊन रक्कम रुपये १०४००६५२५ ( रुपये दहा करोड चाळीस लाख सहा हजार पाचशे पंचवीस फक्त ) वसूल झाली. लोकन्यायालयाच्या सर्व पॅनलवर पॅनल सदस्य म्हणून ,न्यायाधीश, अधिवक्ता व समाजसेवक यांनी काम पाहीले.
लोक न्यायालय यशस्वी होणे करीता श्री य . गो . खोब्रागडे, अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधीकरण अकोला, व स्वरुप बोस , सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश, अकोला तसेच जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एच.के. भालेराव साहेब यांचे बहुमुल्य मार्गदर्शन लाभले तसेच जिल्हा विधी सेवा प्राधीकरण चे सचिव श्री स्वरूप एस . बोस यांनी लोकअदालत यशस्वी करण्याकरीता अथक परिश्रम घेतले. या लोकअदालत मध्ये पॅनल न्यायाधिश म्हणून श्री दा.पां. शिंगाडे, न्यायाधीश श्रीमती शि .म.बैस, न्यायाधीश श्रीमती रे. ब्रि. ठाकूर, न्यायाधीश श्रीमती एस.एम.बनसोड, न्यायाधीश श्री ग . दि . लांडबले, न्यायाधीश श्री कै.प. दावणे, न्यायाधीश श्रीमती पी .पी. नातू, न्यायाधीश एस .के. चौधरी, न्यायाधीश श्री ए. एस. अग्रवाल, न्यायाधीश श्रीमती जे.व्ही. म्हस्के, यांनी पॅनल न्यायधिश म्हणून काम पाहीले तसेच पॅनल अधिवक्ता म्हणून अॅड.एस.जी. डोंगरदिवे, अॅड .बी.के. सावळे, अॅड. वाय.दी. दांदळे, अॅड. एन.एम. गवळी, अॅड.ओ.एन. खंडारे, अॅड.पी.एन. गावंडे, अॅड. आर.बी. तायडे, अॅड एन.एस. तोयडे, अॅड.एस.बी. देशमुख, अॅड.आर.एन. वानखडे यांनी काम पाहीले तर पॅनल समाजसेवक म्हणून डॉ . शेख चांद, सौ. राजेश्री अरूण शर्मा, प्रशांत अंभोरे, साै. सेजल मेहकरकर, गजानन हरणे, विक्रम शर्मा, अशोक रामटेके, सौ. शरयु तळेगावकर, श्रीमती शोभना ठाकरे, मुकेश मेर यांनी काम पाहीले.तसेच जिल्हा न्यायालय अकोलाचे प्रबंधक श्री ए.एस. लव्हाळे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अधिक्षक सज्जाद अहमद, वरिष्ठ लिपीक श्रीहरी टाकळीकर, कनिष्ठ लिपीक राजेश देशमुख, कुणाल पांडे, शिपाई मोहम्मद शरीप , शहाबाज खान, इतर कर्मचारी, शिपाई यांनी लोक अदालत यशस्वी करण्या करीता परिश्रम घेतले.