वाडेगांव (डॉ . शेख चांद )– वाडेगांवात जबर दरोडा पडला असुन यामध्ये दोन बँक, दोन ज्वेलर्स दुकान व एक हार्डवेअर दुकान फोडले असून यामध्ये लाखो रुपायाचे नुकसान झाले असून या मध्ये वापरलेले वाहण हे खामखेड फाटया जवळ आढळून आले यामध्ये ज्वेलरी बॉक्स, संधीग्न वाहन, चोरी करण्याचे साहित्य सापडले असून या ठिकाणी तपास सुरू आहे . वाडेगांव येथील पुजा ट्रेडर्स अॅन्ड हार्डवेअर प्रो . प्रा . तुषार भुस्कुटे यांचे दुकान फोडले तसेच दोन बँक त्या मध्ये बुलडाणा अर्बन बँक, दत्तात्रय नागरी पतसंस्था, तसेच न्यु लक्ष्मी ज्वेलर्स, प्रोप्रा. नितेश घरे, लखाडे ज्वेलर्स, प्रोप्रा.आत्माराम लखाडे या दुकाना फोडण्यात आले असून यामध्ये किती नुकसान झाले या संदर्भात पोलीस तपास सुरू आहे. यावेळी अपर पोलीस मोनिका राऊत मॅडम, पोलीस निरीक्षक हरिष गवळी, विषेश पथकाचे पाटील साहेब , बाळापूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार नितीन शिंदे, ऐ.पी.आय. चव्हाण साहेब, पि .एस.आय. वासडे साहेब इत्यादी अधिकारी तसेच पोलीस कर्मचारी, दुकानदार, बँकेचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार उपस्यीत होते. तसेच आय.कार.स्कॉट,आय. बाईक. स्कॉट, फिंगर प्रिन्ट स्कॉट, मोबाईल फॉरेंसिक युनीट, इत्यादी पथक वाडेगांव येथे दाखल झाले असून तपास सूरू आहे.
चौकट वाडेगांव हे गांव बाळापूर तालुक्यातील सर्वात मोठे गांव असून या गावात मोठया प्रमाणात बाजार पेठ आहे. गावाची लोकसंख्या जवळ पास ४० हजार ते ५० हजार च्या जवळ पास असून या वाडेगाव चौकीच्या अंडर १० गाव असून या ठिकाणी ६ पोलीस कर्मचारी असून एका सिप मध्ये ३ कर्मचारी राहातात असे नागरीकांचे म्हणने असून यामुळे येवळी जबर चोरी ची घटना घडली असी चर्चा असून या ठिकाणी पोलीस ठाणे झाले पाहीजे असे मत सर्व सामन्य जनतेचे आहे.