दहावी, बारावी पास उमेदवारांसाठी खुशखबर आहे. भारतीय रेल्वे विभागात मेगा महाभरती होणार असून यासाठी १ लाख ४० हजार पदे भरावयाची आहेत. एनटीपीसी (NTPC), पॅरा मेडिकल स्टाफ (Para Medical Staff), मिनिस्ट्रीयल आयसोलेटड कॅटेगरी (Ministrials Isolated Category) तसेच आरआरसी ग्रुप डी (RRC-Group D) च्या पदांसाठी सुवर्णसंधी आहे.
* NTPC – कनिष्ठ लिपिकसह टायपिस्टसह टायपिस्ट/ लेखा लिपिकसह टायपिस्ट / ट्रेनी लिपिक / गुड्स गार्ड / स्टेशन मास्टर
* Para Medical Staff – स्टाफ नर्स / आरोग्य मलेरिया निरीक्षक / फार्मासिस्ट प्रयोगशाळा सहाय्यक
* Ministrials Isolated Category – स्टेनोग्राफर / मुख्य कायदा संरक्षक / ज्युनिअर ट्रान्सलेटर (३५ हजार २०८ पदे)
——————————————————————————————————
* RRC-Group D – ट्रक मेंटेनर/ गेटमॅन/ पॉईंट्समॅन / हेल्पर्स (१ लाख ३ हजार ७६९ पदे)
——————————————————————————————————
परीक्षा पध्दत –
रेल्वे बोर्डाद्वारे वरील उपरोक्त पदांसाठी ऑनलाईन स्वरुपाची परीक्षा घेण्यात येईल.
अट –
एका उमेदवाराला एका पदासाठी अर्ज करता येईल.
परीक्षेची तारीख –
* NTPC – २८ डिसेंबर २०२० ते मार्च २०२१
* RRC-Group D – एप्रिल २०२१ ते जून २०२१
* Ministrials Isolated Category – १५ डिसेंबर ते १८ डिसेंबर २०२०
अधिक माहितीसाठी www.rrbmumbai.gov.in पाहावे