अकोट(देवानंद खिरकर) – अकोला जिल्हा पोलीस अधिक्षक जी श्रीधर यांच्या सकंल्पनेतुन प्रत्येक पोलिस स्टेशनचे कामकाजात सुधारणा होऊन सामान्य नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान होण्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील २३ पोलीस स्टेशनच्या कामकाजाच्या महिनेवारी मूल्यांकन सुरू करण्यात आले आहे.यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये अकोट ग्रामिण पोलीस स्टेशनने तिसरा क्रमांक पटकावला होता.आक्टोबर महिन्यामध्ये अकोट शहर पोलीस स्टेशनने प्रथम क्रमांक तर अकोट ग्रामिण पोलीसानी दूसरा क्रमांक पटकावला होता.यामध्ये अकोट ग्रामिण पोलीस स्टेशनचा कामगिरीचा चढता आलेख असुन मागील तिनही महिन्यापासुन तिसरा,दुसरा,व आता नोव्हेंबर २०२० मध्ये अकोट ग्रामिण पोलीसानी प्रथम पटकावला आहे.दुसरा क्रमांक मूर्तिजापुर शहर,तिसरा क्रमांक अकोट शहरला मिळाला एकदरीत मागील तिन महिन्यापासुन सुरू असलेल्या जिल्ह्यातील पोलीस स्टेशनच्या कामकाजाचे मूल्यांकनमध्ये अकोट पोलीस उपविभागातील अकोट ग्रामिण पोलीस स्टेशनची सरशी पहावयास मिळत आहे.एकंदरीत अकोट पोलीस उपविभागातील अकोट शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनची कामगिरी कौतुकास्पद आहे.ठाणेदार संतोष महल्ले अकोट ग्रामिण ठाणेदार ज्ञानोबा फड या दोन्ही कर्तव्यदक्ष ठाणेदाराचा समन्वय जन सपंर्क असल्याने अकोट शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनची धुरा यशस्वीरीत्या सांभाळत आहेत.