अकोला(देवानंद खिरकर) : विश्व वारकरी सेना, वारकरी साहित्य परिषद, वारकरी क्रांती सेना व वारकरी महामंडळ यांच्या पुढाकाराने विश्व वारकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी गेल्या 2 डिसेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धार्मिककार्यक्रम साठी 100 भाविकांना कोरोना च्या संबंधी अटीव शर्त लावून परवानगी देण्यात यावी यासाठी आमरण उपोषण सुरू केले होते या काळात 4 बैठका अकोला जिल्हाधिकारी यांच्यासोबत निश्फळ ठरल्या मात्र आज आठव्या दिवशी राज्यातील सत्तेतील आमदार गोपिकीसन बाजोरिया,व विरोधात असलेले आमदार रणधीर सावरकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हभप लांडे महाराज यांच्या हस्ते रस घेऊन उपोषण स्थगित करण्यात आले .
यावेळी आमदार बाजोरिया यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासोबत प्रत्यक्ष भेट करून देऊन मागणी मंजूर करण्यात येईल असे आश्वासन दिले तर आमदार रणधीर सावरकर यांनी येत्या 14 आणि 15 डिसेंबर रोजी होत असलेल्या विधिमंडळ च्या अधिवेशनात मागणी लावून धरली जाणार असल्याचे आश्वासन दिल्याने आश्वासनावर विश्वास ठेवून अखेर आठव्या दिवशी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे उपोषणकर्ते गणेश महाराज शेटे यांनी जाहीर केले यावेळी माजी आमदार नारायण गव्हाणकर, माजी मंत्री गुलाबराव गावंडे, जी प अध्यक्ष प्रतिभाताई भोजने,माजी जी प अध्यक्षा पुष्पाताई इंगळे, उपाध्यक्ष राठोड ,गजानन गवई, ह भ प महादेव निमकांडे महाराज, वासुदेव महाराज खोले, प्रबोधनकार सत्यपाल महाराज,संदीपपाल महाराज ,ह भ प गजानन महाराज दहिकर,गजानन महाराज हिरुळकर,रविंद्र महाराज केंद्रे,श्रीधर महाराज आवारे,तुलसीदास महाराज मसने, शिवा महाराज मावस्कर,राजू महाराज कोकाटे,विठ्ठल महाराज चौधरी,देविदास महाराज निखारे,विठ्ठल महाराज खापरकर,ज्ञानेश्वर महाराज गाई ,गजानन महाराज ऐरोकर,गजाननमहाराज गावंडे,योगेश महाराज तांबडे,दिनेश महाराज भामदरे,सोपान महाराज काळूनसे,शिवहरी महाराज इस्तापे, गोवर्धन महाराज भाकरे, विठ्ठल महाराज महल्ले, आदींनी आज भेट दिली












