अकोला: किमान शंभर भाविकांना धार्मिक कार्यक्रमाला नियम व अटी लागू रितसर परवानगी देण्यात यावी यामागणी करिता अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी २ डिसेंबर पासून उपाेषण सुरू केले असून, सोमवारी उपोषणाच्या सातव्या दिवशी जिल्हाधिकारी यांनी उपाेषण कर्त्यांसाेबत चर्चा केली. जिल्हाधिकारी यांनी शेट महाराजांसह उपसिस्थत वारकऱ्यांची समजुत घालण्याचा प्रयन व्यर्थ ठरला. मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी वारकरी आंदाेलन तीव्र करणार असून, येत्या ९ डिसेंबर रोजी राज्यातील जवळपास १ लाख वारकरी अकाेल्यात जमणार.
जिल्हाधिकारी कार्यालयासमाेरील उपोषण मंडपात भजनाचा कार्यक्रम व कीर्तनाच्या कार्यक्रमाचे नियमितपणे सुरू आहे . आमरण उपोषणाला फक्त एकटेच गणेश महाराज शेटे हे बसलेले आहेत. इतर वारकरी मंडळी साखळी पद्धतीने आमरण उपोषण ला भजन कीर्तन करून पाठींबा देत आहेत. साेमवारी संध्याकाळी एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेतली व तात्काळ धार्मीक कार्यक्रमाला 100 लोकांची उपस्थितीची परवानगी देणारे पत्र देण्याची मागणी केली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी हा मुद्दा राज्यस्तरीय असल्याने वरिष्ठ अधिकारी आणि मंत्री यांच्याशी संपर्क करून निर्णय देतो असे आश्वासन दिले होते. त्यानंतर दुसऱ्या फेरीत जिल्हाधिकारी यांनी धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नसल्याचे सांगितले. त्यामुळे उपोषणकर्ते आणि वारकऱ्यांचे समाधान न झाल्याने उपोषण अखंडितपणे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हाधिकारी यांनी शासनाला केले अवगत
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी साेमवारी संध्याकाळी शासनला पत्र पाठवून उपाेषणाची माहिती दिली उपाेषण करत्यांची मागणी लक्षात घेता शासनाने या संदभार्त ताेडगा काढण्यासाठी निर्णय घ्यावा अशी विनंती एका पत्राद्वारे सुचीत केली आहे. साेबतच वारकऱ्यांच्या इशाऱ्या नुसार १ लाखावर वारकरी अकाेल्यात दाखल झाले तर कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निमार्ण हाेऊ शकताे असेही पत्रात अवगत केले आहे.