अकोट(देवानंद खिरकर) – अकोट अकोला मार्गावरील खराब रस्त्यामुळे या मार्गावर मोठमोठे अपघात होत आहेत अपघात टाळण्यासाठी तसेच नितीन गडकरी यांना जाग येऊन त्यांनी रस्त्याचे कामाला गती देण्यासाठी तांदुळवाडी फाट्यावर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.सदर आंदोलन करण्यात आले त्यावेळी नितीन गडकरी यांचा पुतळा तयार करून त्यांना कुंकु टिळा लावून फुलांचा हार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राम म्हैसने यांनी घातला तसेच देवा मला पावशील का नितीन गडकरी जी रस्त्याचे काम पूर्ण करतील काय? असे उद्गार त्यांनी ढोल वाजवून काढलेत या आंदोलनासाठी अकोलखेड येथील ढोलाचे भजन मंडळाचे पुरुषोत्तम लांडे, गजानन शेळके, रामदास गणोरकर, गोवर्धन लोखंडे, गजानन निमकर, वासुदेव पदमने ,अरुण रेचे, रामा तायडे ,पांडुरंग रेचे, रितेश भोरखडे, देवानंद टवलारे, विवेक गणोरकार हे उपस्थित होते तर राम मसने यांच्या नेतृत्वात सरपंच संघटनेचे जगन पाटील निचळ, रामदास मांडवे, विलास साबळे, अविनाश गावंडे, विनोद मगळे ,वैभव पोटे , दत्ता वाघ तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश हांडे, देविदास गावंडे ,शुभम देशमुख, विपुल ठाकरे, प्रफुल म्हैसने वैभव भारसाकडे, सागर ठाकूर ,सागर म्हैसने , पुर्णा जी खोडके,पवन सावरकर, विपुल वसु ,सोपान पाटील गायकवाड, पुर्णा जी खोडके, राजकुमार वानखडे,पादुका संस्थान मुंडगाव चे विजय ढोरे, यांचे सह अकोट तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळीअकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड, पीएसआय डाखोरे, एएसआय पांडुरंग राऊत, हे. पो. कॉ. गोडचवर,हे.पो. कॉ. सारंगधर भारसाकडे, हे.पो.कॉ.हशमतखान पठाण, पो का साबळे, गोपालसिंग डाबेराव अमोल बुंदे, गजानन भगत, पंजाबराव,काळे, उमेश चव्हाण, अनिल शिरसाठ, वामन मिसाळ, विकास गोलाकार, दत्तात्रय हुसे ,प्रेमानंद पचांग, अतुल साबळे, संजय वाघ, रामेश्वर भगत, सचिन पाचुरकर, गीता भांगे ,उषा शिरसाठ, परिनीती वाशिमकर, निलेश खंडारे, सह होमगार्ड पथक तसेच अकोट शहर,हिवरखेड,व अकोट ग्रामीण पोलीस मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता.












