तेल्हारा (किशोर डांबरे) -तेल्हारा येथे बामसेफ व मूलनिवासी संघाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ६४ व्या महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करून संकल्प दिन साजरा केला. यावेळी स्थानिक इंदिरा नगर व डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी भिमराव परघरमोल, राजेश नृपनारायण यांची भाषणे झाली. भिमराव परघरमोल आपल्या भाषणात मध्ये म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय जनतेला कवचकुंडलाच्या रूपाने भारतीय संविधान प्रदान केले आहे. त्यामध्ये प्रत्येक समाजघटकांच्या अधिकाराचा अंतर्भाव केला असून, मनुवादी लोक त्यावर गदा आणू पाहत आहेत. शेतकऱ्यांसाठी अनुच्छेद ४६ प्रमाणे त्यांच्या विकासाची हमी असताना आज लाखो शेतकऱ्यांना गारठनाऱ्या दिल्ली येथे थंडीत आपल्या हक्क अधिकारासाठी आंदोलन करावे लागत आहे. असे एकेक करून सर्वांचे अधिकार संपवले जात आहेत. म्हणून आम्ही आज संविधानाची सुरक्षा, संवर्धन व संरक्षण करण्याचा संकल्प केला पाहिजे. असे ते म्हणाले.
याप्रसंगी भिमराव परघरमोल, राजेश नृपनारायण, पंकज भारसाकळे, विलास पोहारकर,भारत पोहरकार, महादेव धुरंदर, मिलिंद दांडगे, अशोक रायबोले, अनिल पाटील सरोदे, हिंमत दामोदर, गोपाल खोपाले, कैलास चाराटे, सुबोध पळसपगार, सौ. शीतल परघरमोल, सौ भारसाकडे कू.निकिता, कू.अनुजा ची. अरहंत , ची.राज यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सिद्धार्थ बोदडे यांनी केले.