अकोला – तेल्हारा तालुक्यातील तळेगांव येथील निकीता हिवराळे हिचे आत्महत्या प्रकरणात आज जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयाच्या सहायता धनादेशाचे वितरण आज तिचे वडील सुरेश हिवराळे ह्यांना आज वंचितने केलेल्या पाठपुराव्याने करण्यात आले.
निकीता हिवराळे आत्महत्या प्रकरणात तत्कालीन ठाणेदार लवंगडे आणि इतर पोलीस कर्मचारी ह्यांना सहआरोपी करणे व इतर आरोपींचा जामीन नामंजूर करणे व इतर गुन्ह्यात अटक करणे ह्या मागणी साठी वंचित बहूजन आघाडीचे वतीने ह्या साठी वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे आणि तालुकाध्यक्ष अशोक दारोदार सातत्याने पाठपुरावा करीत होते.
समाज कल्याण विभागाचे वतीने दिल्या अर्थसहाय्य बाबत वंचित च्या पदाधिकारी ह्यांनी विभागीय सहायक आयुक्त विजय साळवे ह्यांची भेट घेऊन तातडीने अर्थसहाय्य करण्याची मागणी केली होती.त्याअनुषंगाने साळवे ह्यांनी तातडीने निधी मंजूर केला होता. त्या अर्थसहाय्याचा धनादेश आज समाज कल्याण निरीक्षक सौ एस एस राठोड ह्यांनी सुरेश हिवराळे ह्यांना सुपूर्द केला.ह्यावेळी वंचितचे प्रदेश प्रवक्ता तथा युवा प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे,तालुकाध्यक्ष अशोक दारोकार, मनपाचे माजी गटनेता गजानन गवई, सचिन शिराळे, विकास सदांशिव, विजय तायडे, पुरूषोत्तम अहिर, प्रभाकर अवचार, मनोहर बनसोड, शंकरराव इंगोले प्रामुख्याने उपस्थित होते.