तेल्हारा( प्रतिनिधी) – तेल्हारा तालुक्यात नायब तहसीलदार गुरव यांची नियुक्ती झाल्यापासून कारवायांचा सपाटा सुरू असून गेल्या काही महिन्यांपासून वाळूची वाहतूक बंद होती मात्र आता गेल्या तीन दिवसांपासून पुन्हा ब्रेक के बाद वाहतुकीला उधाण आले आहे.
रेतीचा अवैध रित्या थप्पा मारून त्याची विक्री करण्याचा रेती माफियांचा प्रयत्न उधळल्या गेला.नायब तहसिलदार राजेश गुरव यांनि धडक कारवाई करीत आडसुळ शिवारातील साठ ते सत्तर ब्रास रेती जप्त करून तेल्हारा तहसिल कार्यालयाच्या आवारात ठेवण्यात आली.तालुक्यात कोणत्याही रेती घाटाचा लिलाव झाला नसतांना दि.३ डिसेंबर रोजी तालुक्यातील आडसुळ शिवारात एकाच ठिकाणी सुमारे साठ ते सत्तर ब्रास रेतीचा साठा आढळून आला.तेल्हारा तहसिल चे नायब तहसिलदार राजेश गुरव यांनी सदर ठिकाणी छापा टाकून विक्रीच्या दृष्टीने जमा केलेला रेतीचा विशाल ढीग जप्त केला.जप्त केलेला माल उचलून तहसील कार्यालयात जमा केल्याची पहिलीच घटना असल्याने रेती माफीतांचे धाबे दणाणले असून अशाच प्रकारे अनेक रेती माफिया यांनी अवैध रेती चा व्यवसाय करून करोडो रुपये ची माया गोळा केली असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवीला आहे तसेच निनावी वाहनाव्दारे होत असलेली अवैध रेतीची वाहने महसूल विभागाने पकडली असून त्या वाहनावर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अकोला यांचे कडून काय कार्यवाही होते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे हि कारवाई करताना यावेळी तलाठी मांडवे , तलाठी ढोक, तलाठी बळीराम वारूळकर,मंडळ अधिकारी सौदागर,सरपंच, पोलिस पाटील आरसुळ यावेळी उपस्थित होते