देशातील मराठी पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या आणि 81 वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेली मराठी पत्रकार परिषद उद्या 81 वर्षे पूर्ण करून 82 व्या वर्षात पदार्पण करीत आहे.. परिषदेचा 81 वर्षांचा हा प्रवास जेवढा प्रेरक तेवढाच कष्टप्रद होता.. परिषदेच्या या वाटचालीत असे अनेक प़संग आले की परिषदेचे अस्तित्वच नामशेष होते की काय असा प़श्न निर्माण झाला.. मात्र परिषद प़त्येक संकटातून ताऊन सुलाखून सहीसलामत बाहेर पडली.. आज महाराष्ट्रातील 36 जिल्हे आणि 354 तालुक्यात तर परिषदेच्या शाखा आहेतच त्याचबरोबर दिल्लीसह शेजारच्या काही राज्यात परिषद कार्यरत आहे.. 8000 पत्रकार परिषदेशी जोडलेले आहेत.. देशातील दुसरया क्रमांकाची सर्वात जुनी आणि सर्वात मोठी पत्रकार संघटना म्हणून परिषद देशभर ओळखली जाते.
स्वातंत्र्य लढा असो की, संयुक्त महाराष्ट्रासाठीचा लढा असो किंवा बिहार सरकारचे काळे विधेयक असो परिषदेने प्रत्येक वेळी बिणीचा शिलेदार म्हणून भूमिका पार पाडली.. पत्रकारांच्या हक्काच्या प़श्नांसाठी परिषदेने सतत संघर्ष केला.. त्यातूनच पत्रकार संरक्षण कायदा झाला.. असा कायदा असणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले आणि एकमेव राज्य आहे.. ज्येष्ठ पत्रकारांना सर्वाधिक पेन्शन देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे.. त्याचे श्रेय निर्विवाद परिषदेचे आहे.. पत्रकार आरोग्य योजना, छोटया वृत्तपत्रांचे जाहिरात विषयक आणि अन्य प़श्न, श्रमिक पत्रकारांचा मजेठियाच्या अंमलबजावणीचा विषय, गा़मीण पत्रकारांचे अनेक प्रश्न परिषदेच्या रेट्यामुळे सुटले हे कोणी नाकारू शकत नाही.. सिंधुदुर्ग नगरीत उभारल्या जात असलेले बाळशास्त्री जांभेकर स्मारकाचे काम सिंधुदुर्ग पत्रकार संघ आणि परिषदेच्या संयुक्त रेटामुळे मार्गी लागले.. परिषद केवळ सरकारच्या कृपेवर अवलंबून असते असे नाही.. परिषद आणि जिल्हा संघ, तालुका संघांनी गेल्या तीन वर्षात गरजू पत्रकारांना 51 लाख रूपयांची मदत केली आहे. परिषदेशी संलग्न अनेक जिल्हा आणि तालुका संघांनी सवत:चे पत्रकार सहाय्यता निधी उभारून आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.. पुढील काळात परिषद मोठा निधी ऊभारून त्यातून गरजू पत्रकारांना मदतीचा हात देणार आहे..कोरोना काळात अनेक जिल्हा आणि तालुका पत्रकार संघांनी केलेले कार्य पत्रकारांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलण्यास भाग पाडणारे ठरले.
वरील सर्व गोष्टींपेक्षा सर्वात महत्वाची बाब म्हणजे मराठी पत्रकार परिषदेने राज्यात पत्रकारांची मोठी चळवळ ऊभी केली.. दोन पत्रकार एकत्र येत नाही हा परंपरागत समज बदलून हम सब एक है चा विश्वास निर्माण करण्यात परिषद यशस्वी झाली.. परिषदेच्या नेतृत्वाखाली राज्यातील पत्रकारांच्या 12 संघटना एकत्र आल्या आणि त्यातून पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती जन्मास आली.. या समितीने कायद्याची लढाई लढली, ती यशस्वी करून दाखविली.. आज स्थिती अशी आहे की, परिषदेची भूमिका महत्वाची आणि निर्णायक ठरते हे अर्णब अटक प़करणाच्या वेळेस जगानं अनुभवलं.. अर्णब प्ंकरणी परिषदेनं आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर गोस्वामी यांच्या अटकेच्या निषेधाचा सूर देखील मराठी पत्रकारितेतून उमटला नाही.. संघटन शक्तीचा उपयोग कोणाच्या वैयक्तीक भानगडीत पाठराखण करण्यासाठी होता कामा नये ही परिषदेची तेव्हाची भूमिका होती.. अर्नब गोस्वामी यांची अटक चौथ्या स्तंभावरचा हल्ला नव्हती ही परिषदेची भूमिका नंतर जगानं मान्य केली..हा झाला एक भाग.. मात्र जेव्हा कोणी खरंच चौथ्या स्तंभावर हल्ला करते तेव्हा परिषद चवताळून उठते याचा अनुभव अनेकांनी अनेकदा घेतला आहे..
पत्रकारांवर हल्ला झाल्यानंतर चांदा ते बांदा अशा दोन टोकाचे पत्रकार एकत्र येऊन आवाज देतात.. एसएमएस आंदोलनाच्या वेळेस 10,000 एसएमएस मुख्यमंत्र्यांना सहज जातात ही आज मराठी पत्रकार परिषदेची ताकद आहे.. मात्र ही संघटन शक्ती विधायक कामासाठीच, पत्रकारांच्या हक्कासाठी आणि चौथ्या स्तंभाच्या रक्षणासाठीच वापरली जाईल यांची डोळ्यात तेल घालून आम्ही विश्वस्त म्हणून काळजी घेत आहोत.. सामाजिक बांधिलकी हा परिषदेचा आत्मा आहे.. समाजहिताचे अनेक उपक्रम परिषद राज्यभर राबवित असते.. वनराई बंधारे बांधणयापासून ते तळयातला गाळ काढण्यापर्यंत परिषदेच्या सदस्यांनी विविध मोहिमा राबविल्या आहेत.. या सारया कामातून एक पत्रकार आणि समाजहिताची मोठी चळवळ महाराष्ट्रात उभी राहिली आहे.. याचं श्रेय आमच्या पुर्वसुरींनी ज्या पध्दतीनं परिषदेची जडणघडण केली त्याला जाते.. परिषदेचे संस्थापक अध्यक्ष राहिलेले काकासाहेब लिमये असतील, न. र. फाटक असतील, य. कृ. खाडिलकर, आचार्य अत्रे, अनंत भालेराव असतील, रंगा अण्णा वैद्य असतील किंवा वसंत काणे, असतील हे सारे आणि अन्य आमचे माजी अध्यक्ष केवळ पत्रकार नव्हते तर सामाजिक कार्यकर्ते ही होते.. तो वारसा परिषद पुढे चालवत आहे..हा वारसा चालवताना परिषदेने कायम रोखठोक भूमिका घेतली.. ती घेताना राजकीय हितसंबंधही त्याआड येणार नाहीत याची दक्षता घेतली.. परिषदेचं हे बलस्थान आहे..त्या बळावरच परिषदेची वाटचाल पुढील काळात अधिक समर्थपणे आणि एकसंघपणे होत राहिल याची आम्ही ग्वाही देतो.
अर्थात आज परिषद ज्या मुक्कामाला पोहोचली आहे ते केवळ परिषदेशी जोडल्या गेलेल्या हजारो पत्रकारांमुळे..आम्ही निमित्तमात्र आहोत याची नम़ जाणीव आम्हाला आहे.. राज्यात पत्रकारांची अशी अनेक घराणी आहेत की ते तीन तीन पिढ्या परिषदेशी जोडलेले आहेत.. ही परिषदेची ताकद आहे.. अनेक पत्रकार संघटना आल्या.. गेल्या.. परिषदेचा हा वेलू गगणावरी जात राहिला.. .. परिषद पुढील काळातही अशीच वाढत राहणार आहे, पत्रकारांच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहणार आहे.. “राज्यातील कोणताही पत्रकार आता एकटा किंवा एकाकी नाही परिषद त्याच्याबरोबर आहे” हा विश्वास प़त्येक पत्रकारांच्या मनात रूजविणयात परिषद यशस्वी झाली.. परिषदेचे हे यश मोठे आहे असे आम्हाला वाटते..
मराठी पत्रकार परिषद गुरूवारी आपला 82 वा वर्धापन दिन आरोग्य दिन म्हणून राज्यात साजरा करीत आहे.. राज्यातील 5000 पत्रकारांच्या आरोग्याची तपासणी ऊद्या होणार आहे.. हा ही एक विक्रम आहे.. तो यशस्वी व्हावा हीच अपेक्षा
परिषदेच्या वर्धापन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
एस.एम.देशमुख