अकोट (देवानंद खिरकर) – सहकार नेते अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रमेश मामा म्हैसने (टाकळी) यांचे आज बुधवारी पहाटे निधन झाले .त्यांच्या रुपाने सहकार क्षेत्रातील अजुन एक तारा निखळला आहे.त्यांच्या निधनाने सहकार क्षेत्राला फार मोठा धक्का बसला असुन शोक व्यक्त केल्या जात आहे.जेस्ठ सामाजिक कार्यकर्ते ,माजी जी.प.सदस्य ,सहकार क्षेत्रातील जेस्ठ सहकारी रमेश मामा म्हैसने यांचे आज ओझोन हॉस्पीटल मधे उपचारा दरम्यान दुखद निधन झाल.त्यांच्या मागे पत्नी,डॉ नाना म्हैसने सह 3 मुले,1 मुलगी,व मोठा आप्तपरिवार आहे.अकोट तालुक्यातील चौहट्टा,टाकळी परिसरातील धडाडीने काम करणारे जेस्ठ नेतृत्व काळाने हिरावुन घेतले आहे.रमेश मामा म्हैसने यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांचेवर अकोला येथिल ओझोन हॉस्पीटलमधे उपचार सुरु होते.शेवट परंत्त्यंची ऑक्सिजनची लेव्हल वाढलीच नाही.अखेर त्यातच त्यांचा मृत्यू झाला.त्यांच्या आकम्सिक निधनाने सहकार क्षेत्राला फार मोठा धक्का बसला आहे.तसेच अकोट,चौहट्टा बाजार,टाकळी,देवरी,पळसोद अकोला तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रात शोक व्यक्त करण्यात येत आहे.आज दुपारी 12 वाजता त्यांचेवर अकोला येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले .