तेल्हारा – पोलीस अधिक्षक अकोला यांचे विशेष पथक हे दिनांक ३०/११/२०२० रोजी रात्री दरम्यान तेल्हारा परिसरात अवैध धंद्यावर करणे कामी पेट्रोलिंग करत असताना त्यांना त्यांच्या गोपनीय माहिती देणार यांनी खात्रीलायक माहिती दिली की तेल्हारा शहरात मोठ्या प्रमाणात अवैद्य दारू विक्रेते है दारू साठवणूक करून आहेत. अशा मिळालेल्या माहितीवरून विशेष पथकाचे प्रमुख यांनी रात्री दरम्यान तेल्हारा शहरात एकूण तीन ठिकाणी धाडी टाकल्या असतात त्या दरम्यान १)अमर केशव सिंह ठाकुर वय सत्तावीस वर्ष रा. शिवाजी चौक २) रामबलसिंग गरेबिदास राजपूत वय ५७ वर्ष रा. मिलिंद नगर ३) हितेंद्र मथुरादास गणात्रा वय ४६ वर्ष रा. मिलिंद नगर तेल्हारा यांना ताब्यात घेतले असून त्यांच्यापासून एकूण देशी दारूचे ७३७ कॉटर (१५ देशी दारूच्या पेट्या) की.३८,३२४₹ दारू जप्त करण्यात आली.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अकोला श्री.जी श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख श्री विलास रमेश पाटील यांनी व त्यांच्या पथकाने केली आहे.