दहावी उत्तीर्ण झालेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरी (Govt job) मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. भारतीय तटरक्षक दलाने (Indian Coast Guard) नाविक पदासाठी भरती Indian Coast Guard Navik Vacancy 2020 सुरु केली आहे. भारतीय तटरक्षक दलाची अधिकृत वेबसाइट joinindiancoastguard.gov.in वर अर्ज प्रक्रिया सुरू केली गेली आहे.
या पदांवर निवड झाल्यास तरुणांना सुरुवातीच्या लेवल-३ नुसार २१ हजार ७०० रुपये मूलभूत वेतन मिळेल. याशिवाय डीए व इतर भत्तेही देण्यात येतील. तर प्रधान अधिकारी पदाच्या पदोन्नतीनंतर बेसिक पे लेवल-८ नुसार दरमहा ४७ हजार ६०० रुपये होईल. डीए स्वतंत्रपणे प्राप्त होईल.
ही आहे पात्रता
कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाकडून किमान ५० टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे. एससी, एसटी आणि क्रीडा कोटा अंतर्गत तरुणांना ५ टक्क्यांपर्यंतची सूट मिळेल. अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल २२ वर्षे असावे. एससी आणि एसटी प्रवर्गात जास्तीत जास्त वयोमर्यादेमध्ये ५ वर्षे आणि ओबीसींसाठी ३ वर्षांची सवलत मिळेल.
भारतीय तटरक्षक दलाला दिलेल्या अधिसूचनेच्या शेवटी क्यूआर कोड देण्यात आला आहे. आपल्या स्मार्टफोनमधून हा क्यूआर कोड स्कॅन करून आपल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. आजपासून (ता.३०) अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. आपण ७ डिसेंबर २०२०रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करू शकता.
पोस्ट तपशील
कुक आणि स्टीवर्ड यांची भरती होईल. एकूण ५० पदांवर भरती होईल.
निवड प्रक्रिया
निवड परीक्षेच्या आधारे केली जाईल. निवड परीक्षेसाठी प्रवेशपत्रे १९ डिसेंबर२०२० ते २५ डिसेंबर २०२० पर्यंत डाउनलोड करता येतील.