वाडेगांव ( डॉ . शेख चांद)-वाडेगांव येथील ग्राम सचिवालय परिसरात घानीचे साम्रज्य पसरलेले असून याकडे ग्राम पंचायत कार्यलयाचे दुर्लक्ष असल्याची चर्चा सर्व सामन्य जनतेत आहे. ज्यावेळी पदाधीकारी होते त्यावेळी ही अशीच परिस्थीती होती असे जनतेत चर्चा आहे. आज रोजी सचिवालय परिसरात शासकी कार्यलय असून त्यामध्ये तलाठी कार्यलय, नजुल कार्यलय, ग्राम पंचायत कार्यलय, सेतू केंद्र असे विविध कार्यलय असून तसेच इतर दुकाने,अंगनवाडी असून या ठिकानी दरोज हजारो नागरीक ये जा करीत आहेत .विषेश म्हणजे या ठिकाणी स्वच्छ भारत अभियानचा बोर्ड लावलेला आहे त्याच ठिकाणी कचऱ्याचा ढिग निर्माण होत आहे . या ठिकाणी दवाखान्यातील घाण सुध्दा टाकण्यात येत आहे. सध्या सर्वत्र कोरोना ची साथ असून दवाखान्याच्या कचऱ्याची जाळून विलेवाट करावी लागत असून तरी या ठिकाणी टाकण्यात येत आहे.याकडे ग्रामपंचायत कार्यलय दुर्लक्ष का करते अशा प्रश्न जनतेला पङला आहे.
वाडेगांव ग्रामपंचायत मध्ये प्रशासक तसेच ग्राम सेवक गैरहजार असल्याची चर्चा सर्व सामन्य जनतेत आहे. नागरीकांचे कोणत्याच प्रकारचे काम वेळेवर होत नाही. तसेच ग्राम पंचायत कर्मचारी, सफाई कामगार यांचे कित्येक महिन्यापासून पगार झालेले नाही अशी चर्चा असून याकडे संबंधीत अधिकारी लक्ष देणार का ,अशी चर्चा जनतेत आहे.