अकोला(प्रदिप कोलटक्के) – बांधवांनो गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील शासकीय व निमशासकीय कार्यालयात कार्यरत असलेल्या अनुसूचित जमातीतल बांधवांवर आधी संख्या पदावरून त्यांच्या नोकऱ्यांवरती टांगती तलवार होती.
संपूर्ण महाराष्ट्र मध्येच एक भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आणि कर्मचारी वर्गामध्ये अत्यंत निराशाचे वातावरण निर्माण झाले होते.त्यावर महाराष्ट्र सरकार मध्ये या विषयावर वाचा फोडण्याकरिता संपूर्ण महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीतील बांधवांनी कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांना विनंती केली होती.त्यावर आमदार रमेशदादांनी लोणावळा येथे दि.21 नोव्हेंबर 2020 रोजी विशेष बैठक घेऊन त्यावर मार्ग काढण्याकरिता मी स्वतः पुढाकार घेऊन महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीचे बांधवांना न्याय दिल्याशिवाय गप्प राहणार नाही असे प्रतिपादन त्यांनी लोणावळा येथील विशेष बैठकीमध्ये केले होते.
त्या अनुषंगाने आमदार रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोळी महासंघाचे शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे मंत्री मा.ना. श्री.अनिल जी परब साहेब यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली व त्यांना विनंती केली की ह्या प्रश्नावर आपण महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याशी त्वरित बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे महामहीम श्री भगतसिंग कोश्यारी यांचीसुद्धा भेट घेऊन त्यांनी कर्मचाऱ्यांच्या विषयावरती त्वरित हस्तक्षेप करून महाराष्ट्र शासनाला आधी संख्या पदावर रुजू असलेल्या सर्व कर्मचारी बांधवांना अभय देण्याची विनंती केली.
ह्या सर्वांचा पाठपुरवठा कोळी महासंघाच्या शिष्टमंडळाने करून काल दि. 27 नोव्हेंबर 2020 रोजी मा.मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी अखेर आधी संख्या पदावर रुजू असलेले सर्व बांधवांना अभय देऊन दिलासा दिला आहे, त्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब तसेच परिवहन मंत्री श्री अनिलजी परब साहेबांचे, आमदार रमेशदादा पाटील साहेबांचे, कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी,सरचिटणीस राजहंस टपके, शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख श्री विलास चावरी, उपविभाग प्रमुख श्री चिंतामणी निवटे, कर्मचारी आघाडी प्रमुख श्री रामभाऊ कोळी, ॲड.चेतन पाटील आदी मान्यवरांचे कर्मचारी बांधवांच्या वतीने शतशः आभार!