• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, May 23, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्याच्या दौऱ्यावर; ‘एसपीजीवर’ सुरक्षेची जबाबदारी

Team by Team
September 25, 2021
in महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
80 1
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्याच्या दौऱ्यावर; ‘एसपीजीवर’ सुरक्षेची जबाबदारी

Gaya: Prime Minister Narendra Modi arrives at Gaya Airport in Bihar on Jan 5, 2019. (Photo: IANS)

13
SHARES
576
VIEWS
FBWhatsappTelegram

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला ते भेट देणार असून कोरोना विषाणूवरील लसीची ते माहिती घेणार आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. पुणे पोलिसांसह विशेष सुरक्षा दलावर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असणार आहे. पंतप्रधानांच्या प्रवासाठी नुकतेच बोईंग ७७७ ही दोन विमाने दाखल झाली असून त्यांचे नामकरण ‘एअर इंडिया वन’असे करण्यात आले आहे. या विशेष विमानाने पंतप्रधान मोदी पुण्यात येण्याची शक्यता आहे.

देशातील कोरोना विषाणूच्या लसीच्या प्रगतीची पाहणी करण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. त्यांच्यासोबत १०० देशांचे राजदूत असल्याने या दौऱ्याला मोठे महत्व आहे. दुपारी १२.३० वाजता पंतप्रधान मोदी हे लोहगाव विमानतळ येथे येणार असून त्यानंतर ते हेलिकॅाप्टरने ‘सिरम’मध्ये जाणार आहे. या काळात पुणे पोलीस आणि विशेष सुरक्षा बलावर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असणार आहे.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशातील मोठ्या पदावरील महत्वांच्या व्यक्तींसाठी विशेष सुरक्षा दलांची आवश्यकता जाणवू लागली. त्यानंतर या बलाच्या स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली. १८ फेब्रुवारी १९८५ ला केंद्रीय गृह मंत्रालयाने या साठी बिरबलनाथ समितीची स्स्थापना केली. या समितीने स्पेशल प्रोटेक्शन युनिटच्या स्थापनेचा प्रस्ताव दिला. ३० माचर्च १९८५ ला राष्ट्रपतींनी कॅबिनेट सचिवालयाला याची मान्यता देत या साठी ८१९ पदांच्या निर्मितीला मंजुरी दिली. त्यानंतर २ जुन १९८८ ला भारतीय संसदेच्या एका अधिनिय मानुसार स्पेशल प्रोटेक्क्शन ग्रुपची (एसपीजी) स्थापना झाली.

कुठल्याही प्रकारच्या हल्यापासून पंतप्रधानांची सुरक्षा करण्यास सक्षम-

‘एसपीजी’मध्ये असलेले स्पेशल कमांडो हे पंतप्रधानांचे कुठल्याही प्रकारच्या हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी सक्षम असतात. त्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण अतिशय कठीण असते. सर्व प्रकारची आधुनिक हत्यारे, आधुनिक गाड्यांचा ताफा या बलांकडे असतो. आण्विक हल्ल्यापासूनही बचावासाठीही या दलातील जवानांना विशेष प्रशिक्षण दिले जाते. डायरेक्टर जनरल दर्जाचा आयपीएस अधिकारी या दलाचा प्रमुख असतो. त्याचे कार्यालय दिल्ली येथील पंतप्रधान निवास स्स्थानात आहे.

राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या प्रवासाठी आता एअर इंडिया वन-

देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या देशातील तसेच परदेशाच्या प्रवासाठी बोईंग ७७७ ही दोन विमाने खरेदी करण्यात आली आहे. ही भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. अमेरीकेत राष्ट्रपतीच्या प्रवासाठी एअर फोर्स वन ही विमाने आहेत. सर्व प्रकारच्या क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा या विमानात आहे. त्याच धरतीवर एअर इंडीया वन या विमानात सुरक्षा यंत्रणा आहे. जवळपास ८ हजार ४०० करोड रूपये किमंतीची ही विमाने आहेत. या विमानाने मोदी पुण्यात येण्याची शक्यता आहे.

Tags: पंतप्रधान नरेंद्र मोदीसिरम इन्स्टिट्यूट
Previous Post

अकोला जिल्ह्यातील २२५ सरपंचपदांचे आरक्षण ८ डिसेंबरला!

Next Post

अखेर कोळी महासंघाच्या प्रयत्नांना यश!

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
अखेर कोळी महासंघाच्या प्रयत्नांना यश!

अखेर कोळी महासंघाच्या प्रयत्नांना यश!

सावरा येथे बायपास रोड करा ग्रामस्थांची मागणी

सावरा येथे बायपास रोड करा ग्रामस्थांची मागणी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.