अकोट (शिवा मगर) : मौजा चिंचखेड शिवारात शेत सर्वे नं. 081 मौजा चिंचखेड ता अकोट मधील विहिरीत पडलेले वन्यप्राणी सायाळ ला फिजिकल रेस्क्यू करण्याकरिता दि. 24/11/2020 व दि. 25/11/2020 रोजी विहिरीत नायलॉन जाळी सोडून त्यावर खाद्य पदार्थ टाकून रेस्क्यू करण्याचा प्रयत्न केला परंतू वन्यप्राणी सायाळ ला रेस्क्यू करण्यात यश प्राप्त झाले नाही. त्यामुळे दि. 26/11/2020 रोजी मौजा चिंचखेड शिवारात विहिरीत नायलॉन जाळ सोडून कोरडया विहिरीत बोरवेल चे पाणी सोडल्यामुळे वन्यप्राणी सायाळ पाण्यात पोहू लागले त्यामुळे त्याला जाळीत सुरक्षितरित्या फिजिकल रेस्क्यू करून वन्यप्राणी सायाळ ला सुरक्षितरित्या जंगलात सोडण्यात आले वरील सर्व कार्यवाही श्री. के. आर.अर्जुना उपवनसंरक्षक अकोला वनविभागा अकोला, श्री सुरेश वळोदे सहाय्यक वनसंरक्षक अकोला (वने) श्री, आर.एन. ओवे वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा) अकोला यांचे मार्गदर्शनाखाली श्री अजय बावणे वनपरिमंडळ अधिकारी अकोट वर्तुळ व अधिनस्त वन कर्मचारी एस.जी. जोंधळे वनरक्षक शहानुर बिट श्री जि.पी. घुडे वनरक्षक वि.से. अकोट वर्तुळ सोमंत रजाने, विकास मोरे, यांनी कास्तकार श्री अन्सार अली मान्सून अली रा, अकोट श्री. प्रसाद प्रकाशराव देशपांडे रा. अकोट, श्री प्रमोद आप्पा कोरपडे रा. अकोट, मोतिलाल गौर रा. अकोट, अतुल पाटील, साजिद अली जफर अली यांचे मदतीने पार पाडली