तेल्हारा (योगेश नायकवाडे): देशातील कामगार, शेतकरी कायदे,आणि खाजगीकरण च्या विरोधात देशातील जवळपास 10 प्रमुख कामगार संघटना आणि शेकडो शेतकरी संघटना च्या वतीने दि 26 नोव्हेंबर 20 रोजी पुकारण्यात आलेल्या संपला तेल्हारा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. केंद्र शासनाच्या कामगार विरोधी धोरण आणि शेतकरी, असघटीत कामगार यांच्या वर होणाऱ्या अन्याय आणि ऊर्जा उद्योग च्या खाजगीकरण च्या विरोधात तेल्हारा येथे आयटक आणि महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन च्या संयुक्त विद्यमाने मा तहसीलदार साहेब यांना कामगार च्या मागण्या च निवेदन देऊन शासनाच्या कामगार विरोधी धोरणच निषेध करण्यात आलं, तसेच महावितरण उपविभागीय कार्यालय तेल्हारा येथे वर्कर्स फेडरेशन च्या वतीने द्वारसभा घेऊन खाजगीकरण रद्द करून सर्व सामान्य कामगार यांना न्याय देण्याची घोषणा देण्यात आल्या.
यावेळी द्वारसभेला व निवेदन देतांना वर्कर्स फेडरेशन चे तेल्हारा शाखा सचिव कॉ अफसर शाह अन्वर शाह, कॉ निलेश मगर झोनल सदस्य,कॉ गणेश उज्जैनकर, कॉ संजय माकोडे, कॉ संजय राहटे, कॉ विठ्ठल शेळके, कॉ अक्षय राऊत, कॉ उमेश जवकार,कॉ सुनंदा काळे आयटक तेल्हारा तालुका अध्यक्ष कॉ सरोज मूर्तिजापूरकर कॉ रुपाली उपाध्यक कॉ लता गावंडे कॉ वैजती ठाकरे कॉ जयश्री गावंडे कॉ रेखा कुलट कॉ उषा ताडे कॉ आशा कांबळे उपस्थित होते.