नवी दिल्ली : सध्या पैशाचा व्यवहार करण्यासाठी ऑनलाईन पेमेंटचा ट्रेंड सुरू आहे. यामध्ये google pay या ॲपद्वावरे पैशांचा व्यवहार मोठ्या प्रमाणात होतो. दरम्यान google pay धारकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. गुगल पेच्या नव्या निर्णयामुळे ग्राहकांच्या खिशाला चाट बसणार आहे.
डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म Google Pay पुढील वर्षी जानेवारीपासून ‘वेब अॅप’वरील आपली ‘पीअर-टू-पीअर पेमेंट’ सुविधा (Peer to peer payments facility) बंद करण्याच्या तयारीत आहे. त्याऐवजी कंपनी एक नवीन ‘इंस्टंट मनी ट्रान्सफर पेमेंट सिस्टिम’ आणणार असून त्याचा वापर करण्यासाठी युजरकडे शुल्क आकारण्यात येणार आहे. मात्र, ही सेवा वापरण्यासाठी युजरला किती चार्ज आकारला जाईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
सध्या गुगल पे मोबाइल किंवा pay.google.com वरुन मोफत पैशांचा व्यवहार करण्याची सुविधा देत आहे. मात्र, आता ही सुविधा बंद होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुगलकडून नोटीस जारी करुन वेब ॲप बंद करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे वर्ष २०२१ च्या जानेवारीपासून युजर Pay.google अॅपद्वारे पैसे ट्रान्सफर करु शकणार नाहीत. यासाठी युजरला नवीन गुगल पेचा वापर करावा लागेल. तसेच गुगल पेचे सपोर्ट पेजही जानेवारीपासून बंद केले जाईल, असे गुगलकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
जेव्हा युजर बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करतात, त्यावेळी पैसे ट्रान्सफर होण्यासाठी एक ते तीन दिवसांचा वेळ लागतो. तर, डेबिट कार्डने तत्काळ पेमेंट ट्रान्सफर होते. डेबिट कार्डवरुन पैसे ट्रान्सफर केल्यास १.५ टक्के किंवा ०.३२ डॉलर चार्ज आकारला जातो. अशात गुगलकडूनही इस्टंट मनी ट्रान्सफरसाठी शूल्क आकारले जाऊ शकते, असे कंपनीने सपोर्ट पेजवर नमूद केले आहे.