अकोला – आयटक सह देशातील कामगार कर्मचारी शेतकरी संघटना २६ तारखेला संविधानाला वंदन करत व हेमंत करकरे,कामटे, तुकाराम ओमले ह्या शहिदांना वंदन करून देशव्यापी संघर्षाला सुरवात करीत आहोत.या वर्षाच्या सुरुवातीला ८ जानेवारी २०२० रोजी मोदी सरकारच्या कामगार-विरोधी, शेतकरी-विरोधी आणि देश-विरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी सर्व कामगार संघटनांनी एक दिवसाचा देशव्यापी संप करुण भाजपा-प्रणीत केंद्र सरकारने कृती कडे दुर्लक्ष करुण कोव्हिड मुळे निर्माण झालेल्या आरोग्य आणीबाणी संकटाचा गैरवापर करून केंद्र सरकारने अस्तित्वात असलेले सर्व कामगार कायदे रद्द केले. केंद्र सरकारने कामगार संघटना, राजकीय पक्ष, तसेच लेाकसभा-राज्यसभे मध्ये चर्चा देखील न करता नवीन ४ कामगार विरोधी संहिता (लेबर कोड) पारित केले असल्याने आपल्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी, लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी आणि मोदी सरकारच्या कामगार-विरोधी, शेतकरी-विरोधी आणि देश-विरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी कामगार-शेतकरी वर्गाने पुढाकार घेतला आहे.
अकोला जिल्ह्यात सर्व गावा गावात ७५००/- रू. कोरोना काळात भत्ता अंगणवाडी, आशा, शालेय पोषण आहार कर्मचारी, कृषी विद्यापीठ कामगार, यांना कायम अथवा त्वरित २१०००/- रु. किमान वेतन द्या औद्यागिक कामगार व ई.पी.एस. पेंशन धारक सर्वाना ९००० पेंशन व त्यावर महागाई भत्ता द्या आमच्या मागण्या पुर्ण करा अथवा मोदि सरकार चाले जा असे आंदोलन होत असुन संप यशस्वी करण्या करिता अंगणवाडी आशा शालेय पोषण आहार कृषी विद्यापीठ, औद्योगिक कामगार शेतकरी, शेतमजूर, ई.पी.एस. पेंशन धारक संधर्ष समिति, पशुपालक, मच्छिमार, आदिवासी, छोटे व्यापारी, वाहतूकदार, ग्रामीण कारागीर, बारा बलुतेदार इत्यादी व्यापक जनविभागांचा एक दिवसांचा ऐतिहासिक संपात सहभागी होण्याचे आवाहन तसेच त्याच दिवशी देशभरातील शेतकरी संघटनांनी ‘चलो दिल्ली’ आणि देशभर रस्त्यावरील आंदोलनांची हाक देणार आहे.
२५ नोव्हेंबर देशव्यापी संपाल भारतीय कम्युनिस्ट पक्ष व अनेक पक्षाने पाठिंबा दर्शविला आहे करिता आयटक संघटनेने २६ नोव्हेंबर २०२० पुकाररेल्या संपात सहभागी होण्याचे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉ. आयटक जिल्हा सचिव कॉ. रमेश गायकवाड आयटक जिल्हा अध्यक्ष कॉ. एस. एन. सोनोने, कॉ. भा.ना. लांडे गुरूजी, कॉ. सुनीता पाटिल आयटक अंगणवाडी जिल्हा अध्यक्ष, कॉ. नयन गायकवाड आयटक राज्य कौंसिल सदस्य, कॉ. देवराव पाटिल, जिल्हा उपाध्यक्ष, कॉ. मदन जगताप, कॉ. सुहास अग्निहोत्री, कॉ. रमेश गुहे, कॉ. संतोष मोरे, कृषी विद्यापीठ युनियन कॉ. मायावती बोरकर आयटक आशा जिल्हा सचिव, कॉ. दुर्गाताई देशमुख, कॉ. सुरेखा ठोसर, कॉ. कुसुमताई हागे, कॉ. सरोजताई मुर्तिजापुरकर, कॉ. त्रिवेनीताई मानवटकर, कॉ. आशाताई मदने, कॉ. महानंदा ढोक, कॉ. ज्योति ताथोड, कॉ. मंगला अढावु, कॉ. कल्पना महल्ले, कॉ. ज्योति धस, कॉ. सुनंदा पदमने, कॉ. वंदना डांगे, कॉ. अनुसया पवार व जिल्हा व सर्व तालुका कार्यकारिणी यांनी केले आहे…!