अकोट (शिवा मगर) : अकोला जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक जी श्रीधर साहेब यांनी काही दिवस अगोदर जिल्ह्याचे बऱ्याचशा पोलीस स्टेशन चे कारभारी बदलले आहेत दहीहांडा पोलिस स्टेशन च्या बाबतीत सुद्धा तेच घडले आहे. मोठी स्पर्धा असताना सुध्दा नव्या दमाचे महेश गावंडे यांनी दहीहंडा पोलिस स्टेशनचा पदभार सांभाळला दहीहांडा पोलिस स्टेशन च्या हद्दीत जवळ पास 65 खेडे आहेत, त्यात काही गावांची पोलीस अभिलेखावर संवेदनशील नोंद आहे, अशा परिस्थितीत ठाणेदार महेश गावंडे यांनी दहीहंडा पोलिस स्टेशनचा पदभार स्वीकारताच त्यांनी अवैद्य धंदे करणाऱ्यांवर धडाकेबाज कारवाई करत अवैद्य धंदे करणाऱ्यांवर आपली एक वेगळीच वचक निर्माण केली आहे याचेच जिवंत उदाहरण त्यांच्या आजच्या धडाकेबाज करवाह्यात दिसले आहे.
23 नोव्हेंबर रोजी दहीहंडा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम रेल येथे अवैधरित्या गुटका विक्री होत आहे अशी माहिती पोलिस स्टेशनचे ठाणेदार महेश गावंडे यांना मिळाली मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दहीहंडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार महेश गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI जी पी चौधरी यांनी घटनास्थळी जाऊन आरोपी श्याम भास्कर सुरतकर रा. रेल ता. अकोट जि. अकोला याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडून (1)वा पान मसाला 27 नग मोठे पाऊच किंमत 4590 रुपये (2)वा पान मसाला 50 लहान पाऊच(3) काळी बहार पान मसाला नऊ पाकीट किंमत 1530 रुपये (4)विमल पान मसाला 9 पाकीट किंमत 1980 रुपये (5)राज निवास पान मसाला 31 मोठे पुडे किंमत 930 रुपये (6)निळी बहार पान मसाला 25 पाकीट किंमत 7000 रुपये (7)नजर गुटका 6 पाकीट किंमत 1800 रुपये असा एकूण 17830 रुपये चा ऐवज मिळून आला मिळालेला मुद्देमाल व आरोपीला ताब्यात घेऊन अन्नसुरक्षा मानके कायदा व कलम नुसार गुन्हा दाखल करून झालेला आहे तसेच आज रोजी दहीहंडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी दहीहंडा पोलिस स्टेशन हद्दीत येत असलेल्या ग्रामपुंडा या गावा च्या परिसरात अवैधरित्या देशी दारू विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळताच मिळालेल्या माहितीनुसार कुटासा बीट चे बीट जमदार HC अरुण घोरमोडे व PC राहुल खांडवाय हे घटनास्थळी पोहोचून पुंडा येथे अवैद्य दारू विक्री करणारा आरोपी नामे डिगांबर प्रभाकर मालवे वय 45 रा. पुंडा याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून देशी दारू संत्रा 999 चे 90 मिली चे 45 क्वार्टर एकूण किंमत रु. 1800 चा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी वर गुन्हा नोंद केला आहे सदर कारवाई ही दहीहंडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार महेश गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली HC अरुण घोरमोडे,PC खंडवाय यांनी केली.