पातुर : पातूर येथील साईबाबा जिनिंग फॅक्टरीमध्ये सीसीआय कापूस केंद्राचा शुभारंभ सोमवारी बाळापूर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला. यामुळे तालुक्यातील कापूस उत्पादकांना फार मोठा दिलासा मिळाला असल्याची प्रतिक्रिया यावेळी शेतकऱ्यांनी दिली आहे.
सर्वप्रथम विधिवत पुजा आमदार नितीन देशमुख यांनी करून शेतकरी अरुण कचाले,व पुंडलिक नीमकंडे यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात केला. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख अजय ढोणेे तालुकाप्रमुख रवींद्र मुर्तडकर ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विष्णुपंत महल्ले ,उपसभापती चरणसिंग चव्हाण ,खरेदी-विक्री सोसायटीचे अध्यक्ष अरुण भाऊ कचाले,सभापती लक्ष्मीताई डाखोरे, पंचायत समिती सदस्य संदीप सरदार, पंजाब पवार, सुरज झडपे ,महेफूज भाई ,सुनील गाडगे ,राजू भगत, अनिल इंगळे ,गोपाल पाटील, जगदीश पाचपोर,गजानन पोपळघट ,बबन डुकरे ,जनार्दन डाखोरे, अंबादास देवकर, परसराम उंबरकर ,बंडूभाऊ कढोने ,पुडलिक तायडे, रामभाऊ श्रीनाथ ,अरुण पाटील ,गुलाब मोगरे,अनिल निमकंडे, डॉक्टर दिगंबर खुरसडे ,बालू भाऊ देशमुख ,पंकज बोचरे ,काशिनाथ घुगे ,साईबाबा जिनिंग फॅक्टरीचे रामा सौदागर ,बाळूभाऊ वसतकार ,पूडलीक निमकंडे,राहुल शेंगोकर, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.