अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असून, शुक्रवार, १९ नोव्हेंबर रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी ३२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८,९१९ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १२५७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १२२५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये सुधीर कॉलनी, अकोट, मलकापूर, बालाजी नगर, गंगा नगर व बाळापूर येथील प्रत्येकी दोन, चांदुर खदान, मुर्तिजापूर, बाभूळगाव ता. पातूर, सहकार नगर, डाबकी रोड, सिंधी कॅम्प, नया अंदुरा ता. बाळापूर, बाळापूर, चोहट्टा बाजार, गीता नगर, शिवचरण पेठ, मिलींद विद्यालय, हरिहर पेठ, गोरक्षण रोड, मोहम्मद अली रोड, कान्हेरी सरप, जगनवाडी अकोट, बोर्डी ता. अकोट व काजीपूरा ता. अकोट व खडकी येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
१४ जणांना डिस्चार्ज
शुक्रवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून नऊ तर आयकॉन हॉस्पीटल येथून पाच अशा एकूण १४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
४३० अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८,९१९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८२०२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २८७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४३० अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.