अकोट : हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन.महाराष्ट्र भगवामय करणारे बाळासाहेब ठाकरे यांचा आज संपूर्ण महाराष्ट्रात स्मृतिदिन साजरा होतोय. २०% राजकारण व ८०% समाजकारण हे शिवसेनेचे ब्रिदवाक्य आज संपूर्ण महाराष्ट्रात शिवसैनिकांच्या साक्षीने प्रत्येक गावात आपली छाप सोडत आहे.त्यामध्ये महत्वाचे म्हणजे बाळासाहेबांनी जे सर्वात मोठं पद सांगितले होते… ते पद म्हणजे शिवसैनिक हा शिवसैनिक माझा शिवसेनेचा धनुष्य घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात धावून पडेल आणि मग तो गरीब असो वा श्रीमंत शिवसैनिकच माझ्या भगव्याचा रक्षक असेल आणि मला खात्री आहे..जो पर्यंत या महाराष्ट्रात माझा शिवसैनिक आहे तो पर्यंत हा शिवसेनेचा भगवा डौलाने फडकत राहील याची मला खात्री आहे.असे बाळासाहेबांचे उद्गार आजही शिवसैनिकांच्या मनात आहे.याचीच प्रचिती देत अकोट येथे स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली असून कार्यक्रमात बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांनंतर खरोखरच या महाराष्ट्राचे दैवत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या रूपाने या महाराष्ट्राला लाभले.असे हिंदुहृदयसम्राट आपल्या महाराष्ट्राला लाभले हे आपले भाग्यच आणि आज या महान व्यक्तिमत्वाला मी अभिवादन करत आदरांजली वाहिली यावेळी महिला जिल्हा संघटिका मायाताई म्हैसने,शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे तालुकाप्रमुख श्याम गावंडे,शहरप्रमुख सुनील रंधे,शिवसेना गटनेते मनिष कराळे,उपजिल्हा संघटक विक्रम जायले,तालुका अनुसूचित जाती प्रमुख विजय अंबोरे,आदिवासी तालूका प्रमुख सुभाष सुरतने, शिवसेना शहर संघटक रोशन पर्वतकर, विजय ढेपे, जितेश चंडालिया दिपक रेखाते, राहुल पाचडे विश्राम गवते, प्रशांत येऊल,कुणाल कुलट गजानन कोलखेडे, संजय मावस्कर, नंदू कुलट, उमेश आवारे, गणेश चंडालिया, देवा कायवडे, संजय, डिंडोकार, कार्तिक गावंडे, विजय भारसाकळे उषाताई गिरनाळे, अक्षय जायले, बाळा फुले, सुरेश शेंडोकार, देवानंद बोरोडे, गजानन सिरसाट, गजानन जायले, अंकुश लोखंडे, हर्षला गजानन जायले, दिवाकर भगत ,कमल वर्मा ,यांच्यासह असंख्य आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.