नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठ्या बँकेने ट्विट करुन आपल्या ग्राहकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. आपण एसबीआय ग्राहक असल्यास ऑनलाईन फसवणूकीबद्दल सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. एसबीआयने ट्विट केले आहे की, एसबीआय ग्राहकांना सोशल मीडियावर सतर्क रहावे आणि कोणत्याही दिशाभूल आणि फसव्या संदेशांना टाळावे अशी विनंती आहे.
बँकेने लिहिले आहे की, आम्ही आमच्या ग्राहकांना विनंती करतो की एसबीआयच्या नावाखाली सोशल मीडियावर सुरू असलेल्या कोणत्याही दिशाभूल आणि बनावट संदेशांबद्दल सावधगिरी बाळगा. २० सेकंदाची व्हिडिओ क्लिप शेअर करत बँकेने ग्राहकांना आपली गोपनीय माहिती कोणाबरोबरही शेअर करू नये असे आवाहन केले आहे.
व्हिडिओसह बँकेने एका ट्विटमध्ये लिहिले आहे की, सोशल मीडियावर आमच्याशी बोलताना सतर्क व सुरक्षित राहा. आमच्या कोणत्याही खात्यावर संवाद करण्यापूर्वी व्हेरिफाय करा आणि कोणतीही गोपनीय माहिती शेअर करू नका. सोशल मीडियावर अनेकदा बँकांच्या नावावर बनावट संदेश चालवले जातात. या व्यतिरिक्त जीमेलवर अशा बरेच ईमेल पाठवले जातात. ज्यामुळे ही माहिती बँकेनेच दिली आहे असा भ्रम होतो. परंतु ते बनावट असतात. ग्राहकांना अशा फसवणूकीपासून वाचवण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया अनेकदा आपल्या ग्राहकांना इशारा देते आणि त्यांना सतर्क करते.
मालमत्ता, बँक शाखा, डिपॉझिट कॅपिटल, ग्राहक आणि कर्मचारी या बाबतीत स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशात प्रथम क्रमांकाची बँक आहे. एवढेच नव्हे तर कर्ज वाटपाच्या प्रकरणात एसबीआयही अव्वल क्रमांकावर आहे. गृह कर्जे आणि वाहन कर्जाबद्दल बोलायचं झाल्यास भारतीय स्टेट बँकेचा अनुक्रमे 34 आणि 33 टक्के हिस्सा आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे 22,100 शाखा असलेली भारतातील सर्वात मोठे नेटवर्क आहे. याशिवाय 58,500 एटीएम आहेत.