नवी दिल्ली : कोरोनावरील लस निर्मितीसाठी जगभरातील विविध देश जोरदार काम करत आहेत. मार्चपासून जगभरात कोरोनाचा कहर वाढत गेला. कोरानावर मात करण्यासाठी WHO कडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. सुमारे जगभरात ५ कोटींच्यावर लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १३ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, WHO चे संचालक टेड्रोस घेब्रयासस यांनी खळबळजनक वक्तव्य केल्याने कोरोनावरील लस कितपत काम करणार यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होणार आहे.
WHO चे संचालक टेड्रोस म्हणाले की, कोरोनासोबत लढण्यासाठी इतर उपचारांसोबत कोणतीही लस योग्य काम करेल. मात्र, लस स्वतः कोरोनाला संपवू शकत नसल्याचा दावा WHO कडून करण्यात आला आहे. कोरोनाचा विनाश पुढील काळात होणार नाही. त्यामुळे लोकांच्या चाचण्या घेणे, क्वारंटाइन करणे, ट्रेसिंग आणि फिजिकल डिस्टंसिंग पाळणे आवश्यक असणार आहे.
सुरुवातीला करोनावरील लसीचा पुरवठा मर्यादित असेल. त्यामुळे ही लस देताना आरोग्य कर्मचारी, वृद्ध लोक आणि इतर लोकांना प्राधान्य दिले जाईल. यामुळे मृत्यूची संख्या कमी होईल आणि आरोग्य यंत्रणेला कोरोनाशी लढण्यास मदत होईल, असे टेड्रोस म्हणाले.