चोहोटा बाजार : आधार युवा संकल्प प्रतिष्ठान व राम म्हैसने मित्र परिवाराच्या वतीने आदिवासी ग्राम सोमठाणा येथे आदिवासी बांधवांन सोबत दिवाळी साजरी केली. अकोट मधील माणुसकीची भिंत उपक्रमास नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. कपडे भेट दिले. हेच कपडे व शेकडो नागरिकांना दीपावलीचे फराळ भेट म्हणून दिले. सोमठाणा गावकऱ्यांना माणुसकीच्या भिंतीच्या निमित्ताने आधार युवा संकल्प प्रतिष्ठान ने आधार देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला. अश्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
आकोट शहरांमध्ये माणुसकीची भिंत म्हणून सामाजिक उपक्रम आधार युवा संकल्प प्रतिष्ठान चे अध्यक्ष राम म्हैसने यांनी सुरू केला आहे. या मदत केंद्रात गोळा झालेली कपडे स्वच्छ धुऊन व प्रेस करून ती गरजू नागरिकांना सोमठाणा येथे वितरित करण्यात आले. सोबतच फराळवाटप केले. तत्पुर्वी या गावातील शाळेच्या आवारात बिरसामुंडा जयंतीचा कार्यक्रम पार पडला यावेळी मान्यवरांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर कपडे व फराळाचे वितरण करण्यात आले. या उपक्रमास अकोट शहराचे ठाणेदार संतोष महल्ले, सहकार नेत्या भारतीताई गावंडे, ढमाळ गॅस सर्विस चे सचिन ढमाळ, भावना बेकरीचे भावना संजय कासे, स्वराज नवलकार यांनी सहकार्य केले. तर गावात सरपंच प्रणाली बिजेकार, पूजा पवार, संजय बिजेकर, मावजीलाल कास्देकर, वैभव नायसे, अश्विन हिंगणकर, यांनी मदत केली. या वेळी आधार युवा संकल्प प्रतिष्ठान चे कार्यकर्ते जयदीप चऱ्हाटे, उज्वल ठाकरे, अमोल काकड, गणेश भरसकडे, शिवाजीराव सोनोणे, अक्षय रावनकार, पवन सवरकर, शुभम देशमुख, शिवा म्हैसने, गोपाल सावके, ऋषिकेश गावंडे, शिवम डोबाळे, हिमांशु म्हैसने, अक्षय भावे, प्रफुल म्हैसने, आशिष ठाकरे, कपिल म्हैसने, प्रफुल गिरी, विठ्ठल वसु, प्रकाश कुटे, ऋषिकेश म्हैसने, सौरभ म्हैसने, मोहन ठाकरे, विशाल गावंडे, सागर लापुरकर, विशाल चौधरी, गौरव सुरत्ने, सौरभ सुरत्ने, उज्वल भास्कर, रोहित भास्कर, अक्षय सुरत्ने, पातोंड सर, गोटया गौते, राहुल काकड, पवन मालोकर या वेळी उपस्थित होेते.