अकोट : भगवान श्रीकृष्णाने गाई राखण्याचे काम केले, गाडगे बाबा ने अवघ्या जगाला संदेश दिला गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला ,संत सांगतात निर्लोभी गायीची सेवा तेणे माझी प्राप्ती उद्धवा आणि म्हणून गाय वाचली तर देश वाचेल हिंदू धर्मामध्ये आपण गाय ला माय मानतो पण सध्या या गोमातेवर फार मोठे संकट दिसून येत आहे बऱ्याच ठिकाणी गाय कत्तलखान्यावर कापल्या जात आहेत आणि गोवंश वाचण्याकरिता वरुर जऊळका ता. अकोट जी. अकोला येथील योग योगेश्वर संस्थांच्या माध्यमातून माऊली गोरक्षण संस्थानचे उद्घाटन करण्यात आले.
त्या प्रसंगी श्री विठ्ठल महाराज साबळे यांच्या हरी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता किर्तनाला साथ-संगत गजानन महाराज ऐरोकर,ज्ञानेश्वर महाराज पातोंड, विक्रम महाराज शेटे, सोपान महाराज ऊकर्डे, विलास महाराज कराड, वैभव महाराज वसु, रवी महाराज शेटे प्रवीण महाराज शेटे यांनी केली आणि सर्व ग्रामस्थ मंडळींनी किर्तनाचा लाभ घेतला व कीर्तनानंतर सर्व भाविकांनी गोमातेचे पूजन केले . माऊली गोरक्षण संस्थान चे अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांच्या हस्ते गोमातेचे पूजन करून फटाक्याच्या आतिषबाजी मध्ये गौरक्षण संस्थान चे उद्घाटन करण्यात आले रतन पाटील वानखडे, गावंडे भाऊ, अंबादास पाटील अवारे देवानंद भाऊ तायडे संजयभाऊ शेटे ,गजानन भाऊ सदाफळे, पिंटू भाऊ वानखडे, ज्ञानेश्वर भाऊ ठाकरे ,गिरी भाऊ व समस्त गावकरी मंडळी यांची उपस्थिती लाभली असून गोरक्षण विश्वस्त मंडळातर्फे भक्तांना माऊली गोरक्षण संस्थांना गाईच्या निवाऱ्यासाठी टिन सेड करिता देणगी स्वरूपात मदत व गाईसाठी जास्तीत जास्त प्रमाणात चारा उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले माऊली गोरक्षण संस्थानला ज्या भाविकांना देणगी अथवा चाऱ्याची मदत करायची असल्यास ९७६७११२११२ या मोबाईल नंबर वर संस्थांच्या अध्यक्षांशी संपर्क साधावा ही विनंती करण्यात येत आहे.