तेल्हारा(प्रतिनिधी)- भारतात सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी दिवाळीच्या पर्वावर सर्वांची खरेदीसाठी एकच धूम बघायला मिळते मात्र शहरातील काही चिमुकल्यांची मात्र एक वेगळीच धूम असते ती म्हणजे दिवाळीचा पर्व लागला की या चिमुकले पहिल्या दिवसापासून म्हणजे वसुबारस च्या दिवशी सायंकाळी झाडू,पणत्या,वाती, तेल घेऊन ही बच्चा कँपणी निघते ती थेट छत्रपती शिवाजी महाराज उद्यानमध्ये झाडूपूस करून नंतर कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावतात नंतर पणत्या वाती तेल टाकून सदर ठिकाणी एकप्रकारे दीपोत्सव साजरा करतात.या चिमुकल्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की आधी वडील या ठिकाणी दिवाळीच्या वेळेस दिवे लावीत असत तेव्हा आम्ही त्यांच्या सोबत येत होतो गेल्या काही वर्षांपासून आम्हीच या ठिकाणी येऊन छत्रपती यांच्या उद्यानामध्ये दिवाळीचा हर्षोउल्हास साजरा करतो.या चिमुकल्यांमध्ये शेखर नितीन सिद्धमुखे(१५),दीपिका नितीन सिद्धमुखे(१३),अंगद नितीन सिद्धमुखे(५),अक्षरा मुकेश सिद्धमुखे(८),गौरी मुकेश सिद्धमुखे(६),समर्थ अभिजित लासुरकार(५) असे या चिमुकल्यांची नावे असून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा नगर परिषद प्रशासनाला विसर पडला असणार मात्र या चिमुकल्यांना मात्र दरवर्षी या बाबीचा विसर पडत नाही हे महत्त्वाचे…
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्यासाठी आपले जीवन अर्पण केले होते दिवाळी हा सण हिंदु बांधवांसाठी मोठा सण असून मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करण्यात येतो मात्र ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले अशा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उद्यानामध्ये सादी लायटिंग सुद्धा लावणे महत्वाचे वाटत नाही न प प्रशासनाला या चिमुकल्याकडून शिकण्याची गरज निर्माण झाली आहे असे शहरातील सुज्ञ नागरिक बोलून दाखवीत आहेत.