तेल्हारा : महावितरण, पारेषण, निर्मिती मधील सुमारे 86000कर्मचारी, अधिकारी यांनी बोनस, वेतनवाढच्या दुसऱ्या हप्त्यकरीता 14 नोव्हेंबर पासून संपावर जाणार असून यावेळी दिवाळी अंधारात साजरी करण्याची भीती महाराष्ट्र मधील ग्राहक च्या मनात निर्माण झाली आहे, वीज क्षेत्रातील एकूण 27 संघटना च्यासंयुक्त कृती समितीने सदर मागणी प्रशासनास केलेली आहे,यावर तोडगा काढण्यासाठी आज दि 12 नोव्हेंबर 20 रोजी वीजवितरण च्या 3 कंपनी चे व्यवस्थापन, व ऊर्जा सचिव व संयुक्त कृती समितीच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या दरम्यान मिटिंग झाली परंतु प्रशासन ने सदर मागण्या नामंजूर केल्याने संयुक्त कृती समितीचे वतीने सर्व वीज कर्मचारी, अधिकारी यांनी 14 नोव्हेंबर 20 पासून सकाळी 8 वाजता संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
कोविद 19 च्या महामारीत वीज कर्मचारी, अधिकारी यांनी जीवाची पर्वा न करता संपुर्ण महाराष्ट्र मध्ये अखंडित सेवा दिली तरीही प्रशासनाने मागण्या मान्य न केल्याने निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात वीज कर्मचारी यांनी निदर्शने केले ,तेल्हारा येथे सुदधा वीज कर्मचारी संयुक्त कृती समितीने महावितरण उपविभागीय कार्यालया समोर द्वारसभा आयोजित करून जोरदार निदर्शने केली ,यावेळी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन चे तेल्हारा शाखा सचिव कॉ अफसर शाह अन्वर शाह,एस इ इ चे तेल्हारा संयोजक इंजि. आकाश गुप्ता,इंजि. आकाश पाचभाई यांनी द्वारसभेला मार्गदर्शन केले वतेल्हारा उपविभागातील सर्व वीज अधिकारी, कर्मचारी यांनी संपात सहभागी होऊन संप यशस्वी होण्यासाठी आपले योगदान करण्याचे आवाहन केले यावेळी द्वारा सभेला इंजि. गावंडे मॅडम, कॉ. गणेश उज्जैनकर,कॉ संजय माकोडे, कॉ सुनंदा काळे, कॉ. संजय माकोडे, कॉ. मनीष गिर्हे, कॉ. अमित सातळेकर, कॉ. अरविंद मोरोकर,कॉ. प्रशांत घाटोळ,कॉ. किशोर मालगे, कॉ. लक्ष्मण वसतकार,अशोक पिंपळकर, कॉ. पल्लवी राऊत ,कॉ. शुभम चपटे,कॉ मंगेश मंगळे, श्री वाघ साहेब ऑपरेटर,अमीत पांडे सहित संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.