तेल्हारा : तेल्हारा तालुक्यातील अतिशय महत्त्वाची समजल्या जाणारी ग्रामपंचायत गाडेगाव येथिल सरपंच प्रमोद ज्ञानदेवराव वाकोडे यांचे विरुद्ध गाडेगाव ग्रामपंचायतच्या सात सदस्यांनी नामे विजय सदाशिव बोर्डे,लक्ष्मण रामराव काळे, अरविंद गजानन वानखडे, सौ. कीर्ती पद्माकर पिंगळे, सौ. माधुरी संजय वडतकर, सौ. शारदा गोकुळ हिंगणकर, सौ. मंगला दिनेश गवई यांनी दिनांक १९/१०/२०२० रोजीच्या ग्रामपंचायत गाडेगावच्या विशेष सभेमध्ये अविश्वास ठराव पारित केला होता त्यामुळे सचिव ग्रामपंचायत गाडेगाव यांनी सरपंच ग्रामपंचायत गाडेगाव या पदाचा रिक्त पद असा अहवाल वरिष्ठांना पाठविला होता प्रमोद ज्ञानदेवराव वाकोडे यांनी दि १९/१०/२०२० रोजीच्या अविश्वास ठरावास दि २३/१०/२०२० रोजी जिल्हाधिकारी अकोला यांच्या न्यायालयात आव्हान दिले होते त्यानंतर दि.२८/१०/२०२० च्या शासन निर्णयानुसार थेट निवडुन आलेल्या सरपंच यांच्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव पारित झाल्यानंतर ग्रामसभेची मंजुरी आवश्यक आहे त्यामुळे दि. ४/१०/२०२० रोजी प्रमोद ज्ञानदेवराव वाकोडे यांनी जिल्हाधिकारी अकोला यांच्या न्यायालयात अर्ज दाखल करून दि.१९/१०/२०२० रोजीच्या विषेश सभेमध्ये पारित झालेला सरपंच ग्रामपंचायत गाडेगाव यांचे विरुद्धचा अविश्वास ठराव हा गाडेगाव ग्रामपंचायत ची ग्रामसभा होऊन त्यावर निर्णय होईपर्यंत सरपंचा विरूद्ध अविश्वास ठराव स्थगित ठेवण्यात यावा अशी विनंती केली सदरची विनंती जिल्हाधिकारी अकोला यांनी मान्य करत महाराष्ट्र शासनाने दि.२८/१०/२०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार दि.१९/१०/२०२० रोजीचा सरपंच ग्रामपंचायत गाडेगाव यांच्या विरुद्ध च्या अविश्वास ठरावास स्थगिती दिली व विषेश ग्रामसभेचे आयोजन करण्यात येऊन त्यात ग्रामपंचायत व्दारे पारित झालेल्या अविश्वासाच्या ठरावाला ग्रामसभेसमोर ठेऊन गुप्त मतदानाव्दारे या अविश्वासाच्या प्रस्तावावर चर्चा घडवुन त्याबाबत ग्रामसभेचा निर्णय प्राप्त करून घ्यावा असे आदेश मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांना दिले.या प्रकरणी सरपंच प्रमोद ज्ञानदेवराव वाकोडे यांची बाजु अँड . संतोष रहाटे यांनी मांडली तर अविश्वास ठराव पारित करणार्या सदस्यांची बाजु अँड.अभय थोरात यांनी मांडली