अकोला : मागील काही महिन्यापासून देशात कोरोनाचे संकट आले आहे, त्यावेळी जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या धैर्याने या संकटाला तोंड दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी झाले आहे .पुढील काळात कोरोनाचे संक्रमण वाढू शकते असा प्राथमिक अंदाज आहे त्या पार्श्वभूमीवर जनतेने संयम राखून आपली व इतरांची काळजी घेऊन खबरदारी घ्यावी. आणि दिवाळीचा सण साजरा करावा.
दिवाळी उत्सव साजरा करताना जास्त धुराचे फटाके फोडू न येत. या फटाक्यांमुळे कोरोणा मुक्त झालेल्या रुग्णांना दमा सारखे रोग होऊ शकतात व त्यांना त्रास होऊ शकतो तसेच आबालवृद्धांनाही फटाक्याचा त्रास होऊ शकतो त्यामुळे जास्त धूर सोडणारे फटाके उडवू नये किंवा नागरिकांनी फटाके फोडू नये व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
दिवाळी उत्सव साजरा करताना मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे, हात स्वच्छ धुणे व सनितायाझारचा वापर करणे तसेच घरोघरी भेटी देणे टाळावे असे त्यांनी सांगितले.
बाजारात वस्तू खरेदी करताना गर्दी टाळावी ,सामाजिक अंतर राखावे, मास्कचा वापर करावा असेही आवाहन त्यांनी केले.जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिवाळीनिमित्त जनतेला व शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या व कोरोना काळात खबरदारी घेण्याचे आवाहन केले.