अकोला,दि.4(जिमाका)- जिल्ह्यातील निवृतीधारका, कुटुंब निवृतीवेतनधारक, माजी आमदार तसेच इतर सर्व राज्य निवृतीवेतनधारकांनी नोव्हेंबर पासून 31 डिसेंबर पर्यंत त्यांचे पेन्शन संबंधि बँकेत जावून विहित नमुन्यात हयात प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करावी. त्यासाठी संबंधित बँकेत विहित नमुन्यात हयात प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्याशिवाय त्यांचे जानेवारी 2021 चे निवृतीवेतन काढता येणार नाही. याबाबत अकोला जिल्ह्यातील जिल्हा कोषागारातून निवृतीवेतन घेणाऱ्या सर्व राज्य निवृतीवेतनधारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी मनजित गोरेगावकर यांनी केले आहे.