रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस त्यांना घेऊन अलिबागच्या दिशेने रवाना झाले आहेत. अर्णब यांना घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रायगडमधील आत्महत्या प्रकरणात त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यामुळे पुन्हा एकदा ठाकरे सरकार आणि अर्णब गोस्वामी यांच्यातील विकोपाला जाणार आहे.
मुंबईतील ५२ वर्षीय इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक यांनी ५ मे २०१८ रोजी अलिबागजवळील कावीर येथे आत्महत्या केली होती. अन्वय मुंबईत व्यवसायानिमित्त राहत होते. अन्वय हे मुंबईत ‘कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड’ या नावाने इंटिरिअर डिझाईन करत होते. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी अन्वय एक दिवस आधी कावीरमध्ये घरी आले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तेथील नोकरांना त्यांचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत सापडला.
आईचाही मृतदेह तिथेच होता. पोलिसांना त्या ठिकाणी सुसाईट नोट मिळाली होती. या चिठ्ठीमध्ये अर्णब गोस्वामीसह, आयकास्ट स्लॉशस्काय मिडियाचे फिरोज शेख, मगरपट्टा येथील ‘स्मार्ट वर्क्स ’चे नितेश सारडा या तिघांनी केलेल्या कामाचे पैसे थकवल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे म्हटले होते.
या आत्महत्येनंतर प्रकरणी ‘रिपब्लिक टीव्ही’चे अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरुद्ध अलिबाग पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला होता. या आत्महत्येनंतर नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.