पातूर( सुनिल गाडगे)-
पातुर शहरात दसरा व येणा-या दिवाळीचे औचित्य साधुन पातुर विकास मंचच्या वतीने स्नेहांकन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
पातुर शहरातील आत्महत्या ग्रस्त शेतकरी व शेतमजुर असलेल्या गरजवंत कुटूंबातील गरजु विधवा महिलांना आमदार महेशदादा लांडगे स्पोर्टस् फाऊंडेशन पुणे च्या वतीने मोफत साडी वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रम भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तेजराव थोरात पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व भाजपा च्या नगरपरीषद बांधकाम सभापती सौ.तुळसाबाई राजाराम गाडगे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाला.आमदार महेशदादा लांडगे स्पोर्ट्स फाऊंडेशनचे पदाधिकारी तसेच पातुर येथील सामाजिक कार्यकर्ते ठाकुर शिवकुमारसिंह बायस हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आॅन लाईन उद्घाटन सुपरस्टार प्रसिद्ध सिने-अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाची सुरवात ऋषी वाल्मिकी यांना वंदन करून तसेच भारताचे लोहपुरुष व उप पंतप्रधान सरदार वल्लभ भाई पटेल यांना मानवंदना देऊन करण्यात आली.
आपले मत व्यक्त करतांना ठाकुर शिवकुमारसिंह बायस म्हणाले की ते दरवर्षी त्यांची दिवाळी हे गडचिरोली जिल्ह्यातील अति दुर्गम नक्षलग्रस्त भागात जाऊन आदिवासी बांधवांसोबत साजरी करतात.
तेथील आदिवासी बांधवांना कपडे , महिलांसाठी साडी चोळी , दिवाळी फराळ , लहान मुलांसाठी फटाके , आकाशकंदील , औषधी , गर्भवती महिलांसाठी प्रोटीनयुक्त आहार , सायकल , खेळणी इत्यादी वस्तू भेट स्वरूपात देत असतात.परंतु यावर्षी कोरोणा या संसर्गजन्य रोगामुळे त्यांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला त्यासाठी त्यांची कर्मभूमी असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील आमदार पैलवान महेशदादा लांडगे तसेच पातुर विकास मंचच्या माध्यमातून नगरसेविका सौ.तुळसाबाई गाडगे , भाजपा पदाधिकारी सौ.सपनाताई राऊत यांच्या अमुल्य सहकार्याने आणी सामाजिक भावनेतून हा कार्यक्रम राबवित आहे असे सांगितले.
तसेच मागील दोन महिण्यापासून ते आपल्या जन्मभुमीत करत असलेल्या कामावर प्रकाश टाकत त्यांनी त्या कामांची उजळणी केली.त्यामध्ये पातुर शहरातील सार्वजनिक विहीरीत २५० किलो ब्लिचिंग पावडर टाकून नागरीकांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी प्रयत्न केले , नगरपरीषद च्या माध्यमातून घरोघरी जाऊन आरोग्य तपासण्या केल्या , नागरीकांच्या सहकार्याने श्रमदान करून महामार्गावरील पडलेले खड्डे बुजविले , गावांच्या वेशींचा जिर्णोद्धार व्हावा यासाठी पाठपुरावा , विविध शेत रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण , पातुर शहराला तिर्थक्षेत्राचा तसेच पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळावा , ऐतिहासिक वास्तूंचे जतन व सुधारणा , ग्रामीण उप जिल्हा रूग्णालय यासाठी पाठपुरावा , पातुर शहराची हद्दवाढ लवकर होण्यासाठी प्रयत्न , त्या हद्दीतील नागरीकांना ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाचा हक्क मिळावा यासाठी पाठपुरावा , नागरीकांना दररोज मुबलक पाणी मिळावे , बाळापुर वेस समोरील नाका ते वेस रस्त्ता , टिकेव्ही चौक ते संभाजी चौक रस्त्याचे सौंदर्यीकरण , आधार केंद्र सुरू व्हावे , तहसील व पंचायत समिती कार्यालयात महिलांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था तसेच दर्शनी भागात स्वातंत्र सैनिकांच्या नावांची यादी प्रसिद्ध करणे , नगरपरीषद कर्मचारी वर्गाचे थकित वेतन दिवाळी अगोदर मिळावे , शहिद कैलास निमकंडे यांच्या परीवारास न्याय देण्यासाठी प्रयत्न , पातुर एम आय डि सी मध्ये उद्योगपती राहुल बजाज यांनी एखादा मोठा कारखाना उभारावा यासाठी त्यांच्याशी पाठपुरावा , नमामी गंगे या योजने खाली सुवर्णा नदीचा विकास करणे , श्री सिदाजी महाराज पंच कमिटीला अत्यावध रूग्णवाहीका मिळावी यासाठी पाठपुरावा, माजी सैनिकांचा यथोचित सन्मान करणे , महामार्गावरील अवैध वृक्षतोड संबंधात संबंधित विभागाशी पत्रव्यवहार वेळप्रसंगी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी भेट अशा कामांचा यामध्ये समावेश आहे असे यावेळी त्यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमाला श्रीमती भारती गाडगे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अकोला , होमगार्ड समादेशक संगिताताई इंगळे , सौ.लक्ष्मी गाडगे , समिक्षा वानखडे , यशोदा देवकर , पार्वताबाई खंडारे , हमीदा खान व इतर महिला उपस्थित होत्या.
प्रातिनिधीक स्वरूपात शहरातील ५५ विधवा महिलांना साडी वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.सपनाताई राऊत यांनी करून श्रीमती भारतीताई यांनी आभार व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भाजपा उपाध्यक्ष गणेश गाडगे , रितेश सौंदळे , संदीप गाडगे , पुंडलिक श्रीनाथ , जयश्री आवटे अतुल बायस , अविनाश बायस सैय्यद खालेक यांनी विषेश प्रयत्न केले.
स्वर्गीय माजी आमदार जगन्नाथ ढोणे यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाचा शेवट झाला.