अकोट(शिवा मगर)-दि. 31/10/2020 रोजी मौजा सिरसोली शिवारात श्री नूर खा लतीफ खा यांचे शेत सर्वे नं. 461 मौजा सिरसोली यांचे शेतातील अंदाजे 50 फूट कोरड्या विहिरीत नर प्रजातीचे वन्यप्राणी रानटी डुक्कर पडले असल्याच्या प्राथमिक माहिती मिळाल्या वरून अकोट वर्तुळ क्षेत्रातील वनकर्मचाऱ्यासह मौजा सिरसोली शिवारात पोहचलो असता वन्यप्राणी रानटी डुकरला तिलक राजू मर्दाने रा, अकोट, विशाल रामनाथ सत्याल रा, अकोट, मोहित विनोद मोगरे रा, अकोट, शुभम अर्जुन चावरे रा, अकोट यांचे मदतीने सुरक्षितरित्या फिजिकल रेस्क्यू करून प्राथमिक उपचार करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाहून वन्यप्राणी रानटी डुक्कर ला सुरक्षितरित्या जंगलात सोडण्यात आले वरील सर्व कार्यवाही मा. के.आर. अर्जुन उपवनसंरक्षक अकोला वनविभागा अकोला, मा. श्री सुरेश वळोदे सहाय्यक वनसंरक्षक अकोला (वने) यांच्या श्री, आर.एन. ओवे वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा) अकोला यांचे मार्गदर्शनाखाली श्री अजय बावणे वनपरिमंडळ अधिकारी अकोट वर्तुळ व अधिनस्त वन कर्मचारी डी. ए. सुरजूसे वनरक्षक बोर्डी बिट यांनी पार पाडली